Download App

‘देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’; सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

Anil Deshmukh : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे वसुली कांड गाजले होते त्याच बाबतीत तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने (Sachin Waze) मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. सचिन वाझेंच्या या आरोपांनंतर खळबळ उडालेली असताना आता खुद्द अनिल देशमुख यांचीच प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे.. सचिन वाझेंचा आरोप; फडणवीसांना पत्र

सचिन वाझेंचे आरोप काय ?

सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. यामध्ये आणखी कुणा नेत्याचं नाव आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारलं असता सचिन वाझेंनी जयंत पाटील यांचं नाव घेतलं. आता जयंत पाटील यांचं नाव वाझेंनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. जी काही वस्तुस्थिती होती मी ती सर्वांसमोर आणली होती. ज्यावेळी ही गोष्ट मी महाराष्ट्रासमोर आणली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल आहे. सचिन वाझे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझे यांच्याबाबतीत अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की सचिन वाझे एक अपराधी पार्श्वभुमी असलेला व्यक्ती आहे.

दोन खून प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आली आहे. एका खून प्रकरणात ते अजूनही तुरुंगात आहेत. सचिन वाझे विश्वासार्ह व्यक्ती नाही असे हायकोर्टानेच सांगितलं आहे. असे असताना आता माझ्यावर आरोप लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस सचिन वाझेला फसवत आहेत. मी सांगू इच्छितो की माझ्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सचिन वाझेला सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे मी आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? जळगावच्या तत्कालीन एसपींना फोन करून धकमावलं, CBI चा गंभीर आरोप

follow us