अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? जळगावच्या तत्कालीन एसपींना फोन करून धकमावलं, CBI चा गंभीर आरोप

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? जळगावच्या तत्कालीन एसपींना फोन करून धकमावलं, CBI चा गंभीर आरोप

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमु (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन एसपींना फोन करून धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयने (CBI) मोक्का न्यायालयात केला आहे. सीबीआयने केलेल्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुपारी बाज लोकांच्या सांगण्यावरून श्याम मानवांचे माझ्यावर आरोप; फडणवीसांचं बोट कुणाकडे? 

एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे? असं म्हणत देशमुखांनी एसपींना धमकावलं होतं, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयने मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचा जबाबही सीबीआयने नोंदवला होता. सीबीआयने हा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात देशमुखांनी एसपीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. देशमुखांनी गिरीश महाजन यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सीबीआयने केला.

राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट? 

नेमकं प्रकरण काय?
अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या असे आदेश दिले होते. मात्र हा गुन्हा जळगावच्या हद्दीतील नाही, त्यामुळे हा गुन्हा पुण्यात नोंदवावा, अशी भूमिका प्रवीण मुंडे यांनी घेतली. मात्र देशमुख यांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, त्यांनी गु्न्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रवीण मुंडे यांनी याची कबुली दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल…
गिरीश महाजन हे जळगावातील एका शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळावर होते. त्या शिक्षण संस्थेचा कारभार कोणाकडे असावा यावरून वाद झाला होता. यामध्ये गिरीश महाजन यांनी अन्य संचालकांवर दबाव टाकल्याचा आरोप होता. याप्रकरणी महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube