Download App

अदानी समूहाच्या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप, कोळसा खाणीबाबत ‘अदानी’च्या हितासाठी घाईने सुनावणी

  • Written By: Last Updated:

Coal Mines : नागपूरमधील कोराडी येथील 2×660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध होत असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (Maharashtra Pollution Control Board)13 जुलै रोजी कोळसा खाणीबाबत (Coal Mines)जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाला संबंधित खाण मिळाली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group)खाणीला परवानगी द्यायची असल्यानं कोराडी येथील प्रस्तावित प्रकल्पाची सुनावणी एवढ्या घाईगडबडीत झाल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला. (Opposition to Adani Group’s Coal Mine, Urgent Hearing for Adani’s Interests in Mine)

कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसा खाण केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अदानी पॉवर कंपनीला दिली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे १३ जुलै रोजी जनसुनावणी होणार आहे. दरम्यान, कोळसा मंत्रालयाने जिल्ह्यातील आणखी पाच खाणींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला पर्यावरणाच्या कारणावरून मोठा विरोध झाला होता. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतरही ही सुनावणी घेण्यात आली. यात प्रकल्पाला मोठा विरोध झाला. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोळसा खाणीबाबत सुनावणी होणार असून, याला याला पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आधी चव्हाण, आता पटोलेंची दिल्लीवारी; काँग्रेसमध्ये पुन्हा खांदेपालट होणार? 

कोळसा मंत्रालयाने अलीकडेच लिलाव करायच्या खाणींची सुधारित यादी जाहीर केली आहे. या यादीत देशभरातील 92 कोळसा खाणींचा समावेश आहे. यातील पाच खाणी नागपूर जिल्ह्यामधील आहेत. दहेगाव-झुणकी, दहेगाव सप्तधारा खाणींचाही या कोळसा खाणींमध्ये खाण आणि खनिज विकास व नियमन कायद्यांतर्गत लिलाव करण्यात येत आहे. या दोन्ही एक्सप्लोरड खाणींच्या श्रेणीत येतात. यासह हिंगणा-बाजारगाव (मध्य), हिंगणा-बाजारगाव (उत्तर) आणि हिंगणा-बाजारगाव (दक्षिण) यांचा समावेश आहे. खाणींमध्ये अदानी समूहाला गोंडखैरी येथील खाण 122.83 कोटी रुपयांना देण्यात आली आहे. तसेच चंद्रपूरची भिवकुंड खाण सनफ्लॅगला देण्यात आली आहे. अदानीला दिलेली खाण नागपूर शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून 13 जुलै रोजी गोंडखैर कॅम्प येथील कार्ली गावातील तलावाजवळ सुनावणी घेण्यास सांगितले आहे.

पर्यावरणप्रेमींचा आक्षेप
जिल्ह्यात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना आधीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता कोळसा खाणकामासाठी मान्यता मिळाली आहे. ही खाण भूगर्भात असली तरी ती पर्यावरणासाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरण दूषित होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यातच तालुक्यातील कार्ली तलावाजवळ ही सुनावणी होणार असल्याने पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी आक्षेप घेतला आहे.

Tags

follow us