Orange Export : काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export)बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बांग्लादेशला (Bangladesh)बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा भारतामधून (INDIA)आयात करतो. भारत सरकारने बांगलादेशमधून (Bangladesh) निर्यात होणारा कांदा थांबवला, त्यामुळे बांगलादेशने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क (Import duty on oranges)वाढवून भारताची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे आता बांग्लादेशच्या एका निर्णयामुळे विदर्भातील (Vidarbha)संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत आला आहे.
Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?
बांग्लादेशने विदर्भाच्या संत्र्यावर 88 रुपये प्रतिकिलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. विदर्भातील साधारण अडीच टन संत्रा शेतात पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांसमोर हा संत्रा नेमका विकावा कुठं? असा प्रश्न उभा राहिला आहे.
NCP च्या दोन्ही गटाकडून 5 राज्यांच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय, नेमकं कारणं तरी काय?
गत पाच ते सहा वर्षांपासून फळगळती सुरु असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता मात्र या शेतकऱ्यांसमोर हे उत्पादित संत्र नेमकं विकावं कुठं? असाही प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. याविरोधात विदर्भात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शीमध्येही संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये आंदोलनाला बसलेल्या संत्रा उत्पादक शेतकरी म्हणाले की, विदर्भात सर्वाधिक संत्रा उत्पादन वरुड, मोर्शी भागात केले जाते. कास्तकार बांधव चार ते पाच वर्ष संत्र्याच्या झाडाची लहान मुलासारखं संगोपन करतो, ज्यावेळी त्या झाडाची उत्पादन क्षमता तयार होते.
वरुड-मोर्शी तालुका ड्राय झोनमध्ये असला तरी संत्रा उत्पादक शेतकरी जिवाचे रान करत संत्रा फळ बागा वाचवत राहिला. चांगलं उत्पादन निर्माण होवून सुद्धा योग्य दर आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आज संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बांग्लादेशमध्ये विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ तयार झाली आहे.
आता मात्र बांग्लादेशने संत्र्यावर आयात शुल्क शेकडो पटीने वाढवली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना बांगलादेशची संत्रा बाजारपेठ परवडत नाही. यामुळे बांगलादेशमध्ये जाणारा लाखो टन संत्रा विदर्भात पडून आहे. संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. संत्र्यांचे कॅरेट घेऊन आंदोलक शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना घोषणाबाजी केली.