Download App

सत्तेचा फायदा स्वत:साठी केला जातोय, नाना पटोलेंचा आरोप

  • Written By: Last Updated:

गोंदिया : भाजपा ही शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसून भाजपाला सत्तेमध्ये दहशत वाजवण्याचा काम करत असून केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करून लोकांना आपल्या कसे ओढता येईल. सत्तेचा फायदा स्वत:साठी केला नाही पाहिजे. जनतेसाठी केला पाहिजे. सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने थोपटत आहे. याकडे जास्त लक्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बाबतीत भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. असा टोला नाना पटोलेंनी सरकारला लगावला ते आज गोंदियात माध्यमांशी बोलत होते.

लोकांवर दहशद निर्माण करून लोकांवर केंदीय तपासयंत्रणेचा दबाव आणून आपल्या पक्षात येण्याचे काम भाजप करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे भाजपचे सध्या लक्ष नाही. भाजप फक्त आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना या देशातील शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ते फक्त सत्तेचा वापर स्वतःसाठी करत आहेत.त्यांनी सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे.

भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे असे नाना पटोले म्हणाले, इकडे जगाचा पोशिंदा रोज आत्महत्या करत आहे, त्याने कष्टाने पिकवलेल्या शेत मालाला भाव मिळत नसल्याने हे टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे. पण सरकार हे सर्व नुसतं पाहत आहे यावर काही ठोस उपाय करत नाही.

चिंता वाढली, तापाने मुंबई फणफणली, काळजी घेण्याचे आवाहन 

शेतकऱ्याच्या कांदा, कापूस या पिकाला भाव भेटत नाही यासाठी शेतकरी रोज रस्तावर उतरत आहे. आपण म्हणतो आपला देश कृषीप्रधान देश आहे. परंतु जर कृषिप्रधान देशातील शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत असेल तर या पेक्षा दुसरं दुर्दैव कोणतं नाही. असं देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us