Prakash Ambedkar News : मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलंय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी नागपूरमध्ये आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही किती उमेदवार लढणार हे वेळवर सांगू. आम्ही तिसरी आघाडी करीत आहोत. ज्यांना यायचे आहे, त्या सर्वांचे स्वागत आहे. आदिवासी समूहाच्या अधिकारासाठी लढा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. सर्व संघटनांनी एकत्र येऊन आदिवासींचे प्रतिनिधी विधानसभेते गेले पाहिजे. आठ दिवसांनी या सर्व संघटना एकत्र येऊन आपल्या अजेंडा मांडणार आहेत. भारतात देशाचे ९० टक्के खनिज आदिवासी भागात आहे. परंतु त्याचा उपयोग गैर आदिवासी करीत आहे. शहरी नक्षलवाद कायदा आल्यास ग्रामीण नक्षलवाद कायदा येणार आहे. याविरोधात आवाज उचलण्यासाठी आदिवासी समाजाचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी विधानसभेत असणे आवश्यक आहे. आदिवासींचे संरक्षण, खनिजाचे संरक्षण आम्हाला करायचे असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
यावेळी बोलताना तुमच्या नेतृत्वात तिसरी आघाडी होणार का? असा सवाल माध्यमांकडून प्रकाश आंबेडकरांना आला. त्यावर ते म्हणाले, मी बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू आहे, त्या हिशोबाने मी नेताच आहे मला कोणाच्याही मंजुरीची गरज लागत नाही. इतरांना मंजुरीची गरज भासत असेल पण मला वाटत नाही, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलंय.
पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी
सध्या माध्यमांकडून महाविकास आघाडीत बिघाड होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता आम्ही तिसरी आघाडीचं करत आहोत, ज्यांना यायचे असेल त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. मला एकजातीय पक्ष चालवायचा नाही. समदुखी समाजाला एकत्रित घेऊन पुढे जायंचं असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.
क्रिमीलिअर म्हणजे जो आरक्षणाचा लाभार्थी आहे तो क्रिमीलिअरमुळे बाहेर पडणार आहे. जो साक्षर नाही त्याला आरक्षण मिळेल पण शिक्षणव्यवस्थेत पदवी मिळवण्यासाठी 20 वर्षे लागतात. जर केंद्र सरकार किंवा रज्य सरकारच्या फायद्याने कोणाला काढायचे असेल तर विशेष वर्गाला तुम्ही टार्गेट करु शकत नाहीत. आरक्षण 1950 ला मिळालं ते 1972 या काळात पाहिलं तर त्यात आरक्षण फक्त 3ते 4 टक्के भरलेलं दिसतं. जसं 72 सुरु होतं ते 80 पर्यंत ही भरण्याची टक्केवारी 3 टक्क्याने वाढते कारण स्वातंत्र्यानंतर ज्या सुविधा मिळाल्या शिक्षण घेऊन बाहेर पडण्यासाठी 20 वर्षे लागली असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अनसुचित जाती, जमातींचे नुकसान करणार आहे.
हिंसाचार पसरवणार तर समाज हिंसाचारीच होणार…
तुम्ही हिंसाचार पसवणार असाल तर समाज हिंसाचारी होणार आहे. यामध्ये लोकांनी भाजप हे हिंसाचार पसवरतं की नाही याचा विचार करायला हवा. हा हिसांचार एखाद्या धर्माविरोधात असेल तर समाज हिंसाचारीच होणार असल्याचीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीयं.