लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वेध लागले आहेत. सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरु आहे. या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघात एनडीएसह (NDA) इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांकडून चाचपणी सुरु आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही (VBA) मागे राहिल्याचं दिसून येत नाही. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेच आयोजन करण्यात येत आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एक खळबळजनक विधान केलंय. लक्षात ठेवा मी राजकारणातला बाप आहे, असं विधान आंबेडकरांनी केलंय. ते नांदेडमध्ये बोलत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पूजा खेडकर पाठोपाठ वडील दिलीप खेडकरही गोत्यात; बंड गार्डन पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल

प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधत असतानाच विधानसभा निवडणुकीला वंचित उमेदवार देणार नाही का? असा सवाल माध्यमांकडून विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना आंबेडकर म्हणाले, तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारण्यास सांगितलं. तुझं जेवढं वय नाही, तेवढी वर्षे पत्रकारितेत माझी गेली आहे, हा प्रश्न इतरांना विचारा, मला नका विचारु कारण मी राजकारणातला बाप आहे हे लक्षात घ्या, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

Don 3: ‘डॉन 3’ मध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंह, फरहान अख्तरने सांगितले धक्कादायक कारण

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ओबीसी-मराठा आरक्षणासाठी दोन्ही सुमदायांमध्ये संघर्ष असल्याची स्थिती आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसींचं आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ वाघमारे, असे अनेक मैदानात उतरले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधकांसह प्रकाश आंबेडकरही सत्ताधाऱ्यांवर धरल्याचं दिसून येत आहे. आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा जिल्ह्या-जिल्ह्यात गाजत असल्याचं चित्र आहे.

टाटांचं विमान, पावसाचा कहर अन् ब्रिटिशांचा पराभव.. हॉकी संघाच्या पहिल्या सुवर्णपदकाची स्टोरीही खास..

आरक्षण बचाव यात्रेतून प्रकाश आंबेडकरांची तोफ सत्ताधारी आणि विरोधकांवर डागली जात आहे. ओबीसी-मराठा आरक्षण सोडवण्याचा फॉर्मूला आमच्याकडे पण आम्हाला सत्ता दिल्याशिवाय आम्ही स्पष्ट करणार नसल्याचं आंबेडकरांनी यात्रेदरम्यानच्या भाषणात स्पष्ट केलं होतं. तर मराठा समाजाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करा, तर ओबीसींनी ओबीसीच्याच उमदेवाराला मतदान करावे, असं आवाहन आंबेडकरांकडून केलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube