पूजा खेडकर पाठोपाठ वडील दिलीप खेडकरही गोत्यात; बंड गार्डन पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल

पूजा खेडकर पाठोपाठ वडील दिलीप खेडकरही गोत्यात; बंड गार्डन पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल

Dilip Khedkar Pune FIR : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याविरुद्ध गुरुवारी (ता. 8) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, कॉलेजच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती 

दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरुद्ध काल रात्री आयपीसी कलम 186, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली होती. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असताना, दिलीप खेडकर यांनी कथितरित्या कार्यालयाला भेट दिली आणि जूनमध्ये पूजा खेडकरसाठी वेगळी केबिन मिळावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी वाद घातल्याची माहिती आहे.

बाहेर होर्डिंगवर पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो अन् मंदिरात पार्वती मातेची पूजा; वादाला फुटलं तोंड 

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द

पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. खासगी कारला दिवा लावल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकरची शिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. त्यानंतर पूजाचे आयएएस पद देखील रद्द करण्यात आलं.

पूजा खेडकरचा जामीन फेटाळला…
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखा तिला अटक करू शकत नाही, यासाठी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तिचा जामीन कोर्टाने फेटाळूल लावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube