बाहेर होर्डिंगवर पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो अन् मंदिरात पार्वती मातेची पूजा; वादाला फुटलं तोंड
धार्मिक उत्सवाच्या पोस्टरवर पॉर्नस्टार मिया खलिपाचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

Mia Khalifa Photo on Hoarding : सध्या तमिळनाडूमध्ये धार्मिक वातावरण आहे. राज्यात अनेक उत्सव सुरु आहेत. या काळात तामिळनाडूच्या मंदिरात देवी अम्मानची ( पार्वती) पूजा केली जाते. (Mia Khalifa) हे सगळे धार्मिक उत्सव होत असताना काही ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यातील एका होर्डिंगमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे धार्मिक कार्यक्रमावेळी होर्डिंगवर चक्क पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे एकच वाद उभा राहिला आहे.
बांगलादेशात जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं; सलमान खुर्शीद यांचा खळबळजनक दावा
कुरुविमलाईमध्ये नागथम्मन आणि सेलियाम्मन मंदिरात कार्यक्रम सुरु आहे. याची सजावट करण्यासाठी लायटिंग आणि होर्डिंग लावण्यात आलं होतं. यावेळी एक आश्चर्यकारण प्रकार पाहायला मिळाला. होर्डिंगवर देवदेवतांसोबत मिया खलीफाचा देखील फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. याबाबदत इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.
देवीच्या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंगवर आधार कार्डच्या फॉर्मेटमध्ये इतर काही लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी पोस्टरही हटवलं आहे. या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पोलिसांपर्यंत ते पोहोचल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे.
विषारी दारुचा घोट जीवावर बेतला; तामिळनाडूत 29 जणांचा मृत्यू
होर्डिंगवर माता पार्वतीच्या बाजूलाच मिया खलीफाचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला होता. होर्डिंगवर मिया खलीफाचा फोटो कोणी लावला हे समजू शकलेलं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मिया खलीफा ही प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. ती अमेरिकेची नागरिक आहे. काही महिन्यांपूर्वी तिने पॉर्न इंडस्ट्रित यापुढे काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.