Bigg Boss OTT 2 ची पहिली झलक पाहिली का? घराच्या खास थीमने सीजनही ठरणार खास

Boss OTT 2

Bigg Boss OTT 2: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस ओटीटीचं सुत्रसंचालन करणार आहे. जिओ सिनेमावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या या शोची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. ( Salaman Khans Bigg Boss OTT 2 first look relese on Jio Cinema social media )

पहिले पतीला संपवलं अन् मग गूगलवर सर्च केलं लग्जरी जेल; वाचा निर्दयी पत्नीची स्टोरी

दरम्यान आता या बिग बॉस ओटीटीची पहिली झलक समोर आली आहे. हा बिग बॉस ओटीटीच्या घराचा आतील फोटो आहे. जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तर या फोटोवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. या फोटोला असे कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘स्पर्धकांच्या पहिल्या झलकने तुमची मनं जिंकली असतीलच, कारण यावेळी जानताच खरी बॉस आहे. त्यामुळे जनतेच्या मागणीवर ही बिग बॉस ओटीटी 2 ची ही पहिली झलक.’

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

काही दिवसांपूर्वीच सलमानने या सीझनचं अॅंथम सॉन्ग गायल्याचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग गाताना दिसत आहे. हे अॅंथम सॉन्ग अत्यंत एनर्जेटीक आहे. या ट्विटमध्ये सलमानने बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन कधी येणार आहे. त्याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. तसेच हे गाणे गाताना तो उत्साहात डान्स करताना दिसला आहे.

Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!

दुसरीकडे या सीजनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता शिगेला गेली असतानाच बिग बॉसच्या घरात बंदिस्त होणार्‍या स्पर्धकांची नावे समोर आले आहेत. त्यात या यादीतील सर्वात आश्चर्यकारक म्हणजे अॅडल्ट फिल्म्सची क्वीन मिया खलिफा (Mia Khalifa), आता Bigg Boss OTT 2 मध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला देखील बिग बॉसमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.

Tags

follow us