Monsoon Session 2023 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गैरकारभाराचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला गेला होता. आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे घोषणा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. ते म्हणाले की वादग्रस्त एमकेसील कंपनीला परीक्षेसंदर्भात काम देऊ नये, असे आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरुंनी त्याच कंपनीला काम दिल्याने आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येईल.
कुलगुरु सुभाष चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एमकेसीएल कंपनीच्या अनियमिततेची चौकशी सुरु असताना त्यांना निकालासंदर्भात कुठलेही काम देऊ नये, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही कुलगुरुंनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच कंपनीला काम दिले. कुलगुरूंवर कारवाई करावी याकरिता राज्यपालांकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात लवकरच चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याची माहीती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना
याकडे विधान परिषदेचे सदस्य तसेच भाजपचे शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना उच्चशिक्षण मंत्री पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चैकशीचे आदेश आणि एमकेसीएल कंपनीला ताबडतोब निलंबनाचे आदेश देण्यात आले होते, असे सांगितले. त्यानंतरही कुलगुरु यांन कंपनीबाबत अत्यंत आग्रही असल्याचे दिसले.
आव्हाडांनी थेट सोमय्यांचीच बाजू घेतली; ‘व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याला…’
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरुन चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरुंना संबंधितावर कारवाई करण्याचे तसेच सदर प्रकरणाचा खुलासा सादर करण्यास कळवण्यात आले होते. कुलगुरुंच्या खुलाशावर आवश्यक कारवाई करण्यासाठी राज्यपालांकडे प्रकरण सदर केले होते, असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.