Download App

अमरावतीचे राजकारण पेटले ! बच्चू कडू सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करतायत, राणांचा गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

Amravati Politics : अमरावतीचं राजकारण आता वेगळ्या वळणाला आले आहे. यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू आहे. ते एकमेंकावर थेट गंभीर आरोप करत आहेत.  आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. आमदार बच्चू कडू हे सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करत आहेत. त्यांनी मला सल्ला देऊ नये, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

Mahadev App scam: कोण आहे सौरभ चंद्राकर, लग्नावर 200 कोटी खर्च, ज्यूस दुकानदार ते ‘सट्टा किंग’

एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर सडकून टीका केली. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर दुसऱ्याचे काम केले. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी आम्हाला इमानदारी शिकवू नये, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तर जिल्ह्यातील एक आमदार हे यशोमती ठाकूर यांच्या चपला उचण्याचं काम करतोय, असेही रवी राणा यांनी म्हटले होत. यावर यशोमती ठाकूर यांनीही प्रत्युत्तर देत माझ्यावर होत असलेल्या आरोपांबाबत मी शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.

Dhangar Reservation: उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, महाजनांनी घेतली भेट, विखेंच्या न येण्याचं रहस्यच

यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्याच्या वादात बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. राणा यांनी यशोमती ठाकूर यांना कडक नोटा दिल्या असतील तर हा निवडणुकीतील गैरप्रकार आहे. त्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. निवडणुकीत नोटा देणारे आणि घेणारे दोघे दोषी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राणा दाम्पत्य हे असे बोलत आहे. फडणवीसांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

त्याला आता रवी राणा यांनी जोरदार उत्तर दिले आहे. राणा म्हणाले, बच्चू कडू हे सरकारला वेगवेगळ्या मार्गाने ब्लॅकमेल करत आहेत. त्यांना मंत्रिपद पाहिजे, त्यासाठी हे सर्वकाही करत आहे. याच माणसाला आवर घ्यालयला पाहिजे. त्यांनी मी सल्ला देऊ नये. देवेंद्र फडणवीसांबरोबर मी गेल्या बारा वर्षांपासून आहे. मी पळ काढणारा माणूस नाही.

Tags

follow us