Sakoli Assembly Election Result 2024: राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघात (Sakoli Assembly Constituency) नाना पटोलेंचा (Nana Patole) अवघ्या 208 मतांनी विजयी झाला.
Wayanad By-Election Result: वायनाडमधून प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरु, 4 लाख मतांनी विजयी
साकोली विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा जिल्ह्यावर नाना पटोलेंची मजबूत पकड आहे. पटोलेंचे भंडाऱ्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी भापजने अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांना संधी दिली होती. मात्र, पटोलेंना नेस्तानुबूत करण्यात भाजपला यश आले नाही. अवघ्या 208 मतांनी नाना पटोले यांना आपला गड राखण्यात कसेबसे यश आलं. या विजयानंतर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत विजय रॅली काढण्यात आली
विधानसभा निवडणुकीसाठी जेव्हा जागा वाटप सुरु होते, तेव्हा कॉंग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील खडाजंगीने महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या निवडणूकीकडे लक्ष लागले होते. अखेर नाना पटोलेंचा निसटता विजय झाला. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजकर यांना मते मिळाली.
Ashutosh Kale : जनसेवेसाठी पुन्हा सज्ज, माझा विजय विकासाचा आणि विश्वासाचा-आ.आशुतोष काळे
फेर मतमोजणीची मागणी फेटाळली….
विजयाच्या घोषणेनंतर माजी खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र, निवडणूक निकाल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी माजे यांनी यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळून लावली.
पटोलेंचा राजकीय इतिहास काय आहे?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. 2009 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर ही निवडणुक लढवली होती. यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र, एनडीए सरकारने शेतकरी विधेयकांविरोधात गदारोळ केल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अखिल भारतीय शेतकरी मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले.
महायुती तब्बल 235 जागांवर आघाडीवर
आतापर्यंत महायुती तब्बल 235 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 137 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 57 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.