Download App

विदर्भात भाजपला मिळाला आक्रमक शिलेदार; आशिष देशमुखांचा गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला विदर्भात आक्रमक शिलेदार मिळाला आहे.

Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव…

आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. ही टीका त्यांना चांगलीच महागात पडली होती. आशिष देशमुखांच्या टीकेनंतर त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. देशमुख यांची सहा वर्षांसाठी हकापट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारण आशिष देशमुख भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज त्यांनी नागपुरात फडणवीस गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

केसरकरांनी दिली ऑफर पण, अजितदादांनी सांगितलं त्यामागचं खरं कारण

त्यानंतर पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशमुख यांची स्वत: भेट घेतली होती. आशिष देशमुख सावनेरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. २०१४ मध्ये देशमुख यांनी भाजपाकडून काटोलमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने ते काँग्रेसमध्ये गेले होते.

अभिमानास्पद! अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाहेर फडकला तिरंगा

पक्षप्रवेशादरम्यान बोलताना आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, काँग्रेस आणि गांधी परिवार ओबीसींच्या विरोधात आहे. आता काँग्रेस गटातटांत विखुरली गेली आहे. पहिल्यासारखा परफॉर्मस काँग्रेसमध्ये राहिला नसून काँग्रेस आता म्हातारी झाली असल्याची टीका त्यांनी केलीय.

Adipurush च्या रेकॉर्डब्रेक कमाईमागे तुमचाही फायदा होणार! जाणून घ्या गणित…

मला पक्षातून बाहेर काढलं ते बर झालं कारण मी आज भाजपात प्रवेश केला असून त्याचा मला आनंद आहे. मी निवडणूकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला नसून 2024 मध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. मी निवडणूक लढणार नाही पण भाजपचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, देशमुख यांच्या प्रवेशानंतर भाजप त्यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे.

Tags

follow us