PM मोदींच्या सभेला जाताना मोठी दुर्घटना : आमदार आशिष जैस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात; दोन ठार

नागपूर : रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात […]

Ramtek Accident

Ramtek Accident

नागपूर : रामटेकचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला जाताना आज (10 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्हान जवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Shiv Sena associate MLA Ashish Jaiswal of Ramtek met with a car accident)

मोहिते पाटलांची घरवापसी! उमेदवारीही फिक्स अन् अर्जाची तारीखही

याबाबत अधिक माहिती अशी की, आज रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या समर्थनार्थ कन्हानमध्ये सभा पार पडत आहे. या सभेची संपूर्ण जबाबदारी आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आली होती. याच सभेला जाण्यासाठी ते रामटेकहून कन्हानच्या दिशेने निघाले होते. मात्र सभेच्या ठिकाणापूर्वी काही किलोमीटर अंतरावरील मध्यवर्ती वळणाच्या पुढे मोठ्या सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसली.

मनसेचे इंजिन महायुतीच्या डब्यांना : कोणत्या मतदारसंघात, किती फायदा होणार?

गाडी धडकताच कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version