Download App

Yashomati Thakur : तीनवेळा विजय, पण चौथ्यांदा पराभव, दुसऱ्या प्रयत्नात राजेश वानखेडे विधानसभेत

  • Written By: Last Updated:

Teosa Vidhansabha Election result : तिवासा मतदारसंघात भाजपचे राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा पराभव केला आहे.

ऐतिहासिक विजय, जनतेने त्यांना जागा दाखवली; निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया 

तिवसा मतदारसंघाध्ये काँग्रेसकडून यशोमती ठाकूर आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर या विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, यशोतमी ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला. 7 हजार 974 मतांना त्यांचा पराभव झाला.

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ पुन्हा झाला ‘आण्णा’मय; चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा मोठा विजय 

2009 मध्ये यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवून भापजचे वर्चस्व मोडीत काढले. 2014 च्या मोदी लाटेतही यशोमती ठाकूर यांनी येथे आपले वर्चस्व कायम ठेवले होते. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. आता चौथ्यांदा मतदारसंघातील विकासकामांचा आराखडा मांडून निवडणुकीला सामोर गेल्या. मात्र, मतदारांनी त्यांच्या विरोधात कौल दिला.

शेवटच्या फेरीत राजेश वानखडे यांना 99 हजार 099 मते मिळाली. तर यशोमती ठाकूर यांना 91 हजार 125  मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या मिलिंद तायडेंना 6684 मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले.

महायुतीची 232 जागांवर आघाडीवर
आतापर्यंत महायुती तब्बल 232 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 135 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 56 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

follow us