Download App

आता भुजबळांच्या कशाला काय लावून बसलात? उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना सवाल

Eknath Shinde on Uddhav Thackeray : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या दादागिरीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेल्याचे सांगत होते. भुजबळांबद्दल सांगत होते की जे बाळासाहेबांना अटक करायला निघाले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पण त्यानंतर भुजबळांनी मातोश्रीवर येऊन माफी मागितली होती. सगळं मिटलं होतं. पण महाविकास आघाडीत असताना अडीच वर्षे कळले नव्हते, कोणाच्या मांडीला मांडी आहे. बरं तेव्हा मी भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो तर आज तुम्ही भुजबळांच्या कशाला काय लावून बसला आहात? असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटाववर जोरदार हल्ला चढवला. ते पुढं म्हणाले की मी हॉस्पिटलमध्ये होतो. मी लोकांना भेटू शकत नव्हतो. माझ्या हाताची बोटं हालत नव्हती. खांद्यापासून खाली संपूर्ण शरीर बधीर झालं होतं. त्यावेळी यांनी पक्ष सांभाळायला पाहिजे होता, राज्य सांभाळायला पाहिजे होतं. पण रात्रीच्या गाठीभेटी करुन मला खुर्चीतून खाली खेचले होते. एवढा नीचपणा हिंदुत्वात नसतो, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

…म्हणून ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं विमान जळगावला वळवले; रस्ते मार्गाने धुळ्याला रवाना

मला यामध्ये भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांची दया येते. सामना चित्रपटात एक गाणे होते. कोणाच्या खाद्यांवर कोणाचे ओझे? आता हे भाजपचे बिचारे कार्यकर्ते कोणतं ओझं घेऊन जात आहे. भाजप आणि संघाच्या लोकांना त्रिपुरा वैगरे भागात मारहाण केली जायची पण तरीही त्यांनी भाजप रुजवला. पण सत्ता आल्यावर सगळे बाहेरुन घेतले. आता ह्या उपऱ्या लोकांच्या ओझ्याखाली निष्ठावान भाजप कार्यकर्ते दबून गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Tags

follow us