…म्हणून ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं विमान जळगावला वळवले; रस्ते मार्गाने धुळ्याला रवाना

…म्हणून ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं विमान जळगावला वळवले; रस्ते मार्गाने धुळ्याला रवाना

CM Eknath Shinde : सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. त्यामध्ये ते यावेळी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना त्यांचे विमान खराब हवामानामुळे वळवावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव जिल्ह्यात उतरवण्यात आले. त्यानंतर जळगाववरून मुख्यमंत्री शिंदे रस्ते मार्गाने धुळ्याला पोहचले. ( CM Eknath Shinde flight divert from Dhule to Jalgaon due to Weather Update )

Udhav Thackeray : मर्दाची औलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं

यावेळी मुख्यमंत्री धुळ्याला पोहचले असता त्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं नियोजन हे धुळे जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस, दलाच्या मैदानावर करण्यात आले. मात्र ऐनवेळी खराब हवामानामुळे त्यांचे विमान वळवावे लागले. त्यामुळे त्यांना कार्यक्रमस्थळी पोहचण्यास उशीर झाला होता.

Uddhav Thackeray : मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे?

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे शासणाच्या 19 विभागाच्या 34 स्टॉलमधून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमात मुख्यमंत्री सचिवालायाची कक्ष उभारण्यात आला आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. दरम्यान आता या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे ते यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube