Uddhav Thackeray : मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे?

  • Written By: Published:
Uddhav Thackeray : मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे?

Uddhav Thackeray : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री पदाच्या टिकेवरून उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाल…मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. ते आज अमरावतीमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray : I myself was not ready to become the Chief Minister, whUdhav Th difference will it make if I become the Prime Minister)

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मी माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्या कोणाला देणार नाही. जर लोक हल्ली पक्ष चोरु लागले असले तरी मी माझ्या पक्षाचे नाव दुसऱ्या कोणाला देणार नाही. पक्षाचे नाव निवडणूक आयोग देऊ शकत नाही, ते माझ्यासोबत राहील, तो त्यांचा अधिकार नाही. आधी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळविला जात आहे. असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

“अमोल कोल्हे कायम घोड्यावरच; ते जमिनीवर कधी आलेच नाहीत! फडणवीसांवरील टिकेला विखेंचे प्रत्युत्तर

माझ्यावर टीका केली गेली की मी लोकांना भेटत नाही. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्री वर भेटणे शक्य नाही. म्हणून मी आता सभेसाठी नाहीतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. या आव्हानात्मक कार्यकाळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना भेटतो आहे.

मी रुग्णालयात असताना रात्री हालचाली, गाठीभेटी चालल्या होत्या, अशी टीका यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांन वर केली. सध्याच्या सरकारची परिस्थिती म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. पूर्वी सरकार मतपेटी मधून सत्तेत यायचे, आता खोक्यातून येते. असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube