Download App

तेथेच बोलायचे अन् तिथेच चिडायचे, त्यापेक्षा लाथ मारा खुर्चीला; वडेट्टीवारांनी भुजबळांना सभागृहात सुनावले !

  • Written By: Last Updated:

नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार यांनी भुजबळांना केले आहे.


‘न्यायालयात टिकणारंच आरक्षण द्या’; रोहित पवारांची CM शिंदेंना हात जोडून विनंती

वडेट्टीवार म्हणाले, सारथी, बार्टीचे प्रश्न सोडविता, त्यांना भरपूर निधी देतात. महाज्योतीला निधी देत नाही, असे छगन भुजबळच सभागृहात सांगत आहेत. पण तुम्ही सत्तेत आहेत. आम्ही निधी मागितला पाहिजे आणि तुम्ही तो दिला पाहिजे. परंतु तुमची भूमिका वेगळीच आहे. कटोरा हातात घेण्याची भूमिका घेता, कशाला पाहिजे हा सोंगडेपणा. बाहेर तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात. त्यामुळे तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे हे दिसत आहे. तुम्ही छाती फोडून बघा कोण दिसतेय ते म्हणता. ते आम्हाला पुढे कळणारच आहे.

‘ती ऑडिओ क्लिप खोटी, फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करणार…’; बबनराव लोणीकरांचा खुलासा

जरांगे मागतो तो त्याचा अधिकार आहे. तुम्ही त्याला बिनडोकपणाचे म्हणता. महाराष्ट्रात तुमचा तमाशा सुरू आहे. जे काय मागायचे ते कॅबिनेटमध्ये मागा , असा सल्लाही वडेट्टीवारांनी भुजबळांना दिला आहे. तुमची क्लिनचिट होऊ द्या, असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला आहे.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात एससीची वर्गवारी

ओबीसीविरुध्द मराठा असे वातावरण राज्यात झाले आहेत. त्यात राज्य सरकारने एक परिपत्रक चार डिसेंबर रोजी काढले आहे. ते परिपत्रक कुठेही दिसत नाही. आता एससी (अनुसूचित जाती) मध्ये भांडणे लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एससीमधील तेरा टक्के आरक्षणाची वर्गवारी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने उद्रेक, नव्याने दंगली, आंदोलने बघायला मिळतील, असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे. कर्नाटक राज्यात असे आरक्षण देण्यात आले आहे. त्या पद्धतीने अ, ब,क, ड वर्गवारी केली जाणार आहे. याबाबत अनेक याचिका कोर्टात पडून असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

follow us