यशोमती ठाकूर यांना राणा दाम्पत्याने खिंडीत गाठले, आता रवी राणांचाही मोठा दावा

अमरावती: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना आता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. या दोघांनी यशोमती ठाकूर यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात येणार होत्या. परंतु मंत्रिपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असा दावा […]

Ravi Rana

Ravi Rana

अमरावती: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना आता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. या दोघांनी यशोमती ठाकूर यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात येणार होत्या. परंतु मंत्रिपद न दिल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला नाही, असा दावा राणा यांनी केला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.

Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले
अमरावती येथील एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांना यशोमती ठाकूर यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचे काम केले असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर काय इमानदारीची भाषा करणार? यशोमती ठाकूर यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर रवी राणांकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचे काम केले आहे, त्यामुळे त्या काय इमानदारीची भाषा करणार? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा

त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनीही आमदार यशोमती ठाकूर यांना कोंडीत पकडण्यासाठी एक मोठा दावा केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा कोण भाजपात प्रवेश करत आहे याची यादी पाहिले होती. त्यात यशोमती ठाकूर यांचेही नाव होते. पण मंत्रिपद भेटत नसल्याने ठाकूर यांनी भाजपात प्रवेश टाळला. त्यावेळी कार्यकर्ता म्हणून काम करा, मंत्रिपद भेटणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठाकूर यांना सांगितले होते, असे राणा यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीही राणा यांनी एक मोठे विधान केले होते. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे तिवसा मतदारसंघातील आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलण्याचे काम करतात. जनतेने आमदार बनवले आहे, पण चपला कोणाच्या उचलता? नेत्यांच्या खुर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला मर्द आमदार म्हणतात, असे म्हणतं रवी राणांनी वानखेडे व यशोमती ठाकूर यांना डिवचले होते. आता पुन्हा राणा दाम्पत्याने नव्याने हे विधाने केले आहे.

Exit mobile version