Devendra Fadnavis On Raj Thackeray Arrest Challange : अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला केल्यानंतर आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सरकारविरोधी बोलण्याची पूर्ण मूभा आहे पण, राज ठाकरेंनी केलेले विधान हे कायदा न वाचता केलेले आहे.
शेकापचा मंच, मराठीचा मुद्दा, फडणवीसांवर तुटून पडले राज ठाकरे!
काय म्हणाले होत राज ठाकरे?
सर्व जमिनी आणि याच्यावरती काय तर म्हणे राज्य सरकारने कायदा आणला आहेत. तुम्ही कोण आहात तर, तुम्ही अर्बन नक्षल आहात. शहरांमध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर कशाला विरोध केला, कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते, एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग इथे आणावे लागतील असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारला चॅलेंज दिले होते.
राज ठाकरे अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे अटक
अर्बन नक्षलवादी म्हणून कार्यकर्त्यांना एकदा अटक करून दाखवा असे राज ठाकरे म्हणाले, त्यावर फडणवीसांनी कुणाला अटक करायची असा प्रतिप्रश्न उपस्थित करत त्यांच्याकरत कायदा बनलेलाच नसल्याचे सांगितले. तसेच अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल असेही स्पष्ट केले. तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही. त्यामुळे तुमची अटक करण्याचे कारण नाही. अशा प्रकारे जे कायदे बनतात जे कायद्याविरोधात वागतात त्यांच्या विरोधात तो कायदा आहे. हा कायदा आंदोलकांच्या विरोधात नसून या कायद्यात सरकारच्या विरोधात बोलण्याच्या पूर्ण मुभा आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी केलेले वक्तव्य हे कायदा न वाचता केलेले असल्याचे माझे मत आहे.
‘पुण्याच्या विकासाला दादागिरीचं ग्रहण!’ फडणवीसांचा भर कार्यक्रमात धक्कादायक खुलासा, दुर्दैवाने…
त्या मानसिकतेला माझा थेट विरोध
महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे हे माझं पक्क मत आहे. ती सरकारने अनिवार्य केलीच आहे. पण, राज्यातील मराठी मुलांना मराठीसोबत मुलांना आणखी एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या या मानसिकतेला माझा विरोध असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
🕜 1.25pm | 2-8-2025📍Nagpur.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/uef08nVKi0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2025