Free Style Clash Between Sadavarte & Shiv Sena Workers During Msrtc Employees Bank Board Of Directors Meeting : एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एसटी बँकेच्या बैठकीत एकनाथ शिंदे-आनंदराव अडसूळ संघटनेचे ४-५ संचालक जखमी झाल्याचे समोर आले आहे. अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याचा राग अनावर झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारी झाले.
Video : पवारांना कळालं म्हणूनच ते आज नव्हते; ठाकरेंसह विरोधकांच्या ECI भेटीवर फडणवीसांनी हवाचं काढली
एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.
आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे.
थोरात कसे पडले? आमचं तुमचं करू नका; निवडणुका पुढे ढकला, ECI कडे राज ठाकरेंची मोठी मागणी
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील फ्री स्टाईल राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात बैठकीत एक व्यक्ती संचालक मंडळाच्या बैठकीचा व्हिडीओ काढण्यास विरोध करत असल्याचे दिसून येतंय. तसेच सुरू असलेल्या बैठकीतील माहिती बाहेर जाता कामा नये असेही ही व्यक्ती सांगत आहे. मात्र, त्याचवेळी राड्याला तोंड फुटतं. समोरील व्यक्तीच्या सांगण्याला विरोध होताच त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीच्या बाजूची व्यक्ती तावातावात उठते आणि थेट बाटली फेकून मारते. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरु होते. यावेळी प्रचंड शिवीगाळ देखील करण्यात आली. व्हायरल व्हिडीओमध्ये हा गदारोळ बघायला मिळत आहे.
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा, सदावर्ते आणि शिवसेनेच्या गटात हाणामारी#fight #StateTransport pic.twitter.com/RNvV8QvlTD
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 15, 2025