मुंबईत कायदा चालतो, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास जरागेंना जेलमध्ये जावे लागणार; सदावर्तेंचा दावा

Gunaratna Sadavarte Manoj Jarange : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईत (Mumbai) आंदोलन करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाचा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी प्रतिक्रिया देत जरांगेंवर जोरदार टीका केली. तसंच मुंबईत कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ते मुंबईत आले तर त्यांना जेलमध्ये जावे लागणार, असा दावाही त्यांनी केला.
Video : “येवल्यावाला लई खौट अन् आतल्या गाठीचा..”, जरांगेंचा भुजबळांवर तिखट प्रहार
मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी ते हजारो समर्थकांसह मुंबईत येण्याच्या तयारीत होते. मात्र, कोर्टाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याचं सिध्द झालं आहे. मी कालच सांगितलं होतं, जरांगे पाटील मुंबईत येणार नाहीत, मुंबईमध्ये कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. खारघर आणि नवी मुंबईमध्ये तरी जरांगे पाटील यांना परवानगी आहे का? असा सवाल सदावर्तेंनी केला. तसंच जर आता जरांगे पाटील यांनी काही केलं तर थेट त्यांना जेलमध्ये जावे लागणार, असा दावाही सदावर्तेंनी केला.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकण वासियांना गोड बातमी; मुंबई ते कोकण रो-रो सेवा सुरू होणार
जरांगेंच्या आंदोलनाचा आत्मा राजकीय
पुढं ते म्हणाले, जरांगेंचं आंदोलन दिसत असले तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले आहे. यापुढे त्यांचे कोणतेही बेकायदा कृत्य चालणार नही, असा इशारा सदावर्तेंनी दिला. किती माजलाय तो, त्याची भाषा मग्रुरीची आहे. जरांगेला अटक झाल्यानंतर कायदा काय असतो हे त्याला कळेल, असं सदावर्ते म्हणाले.
पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, मुद्दा असा आहे की, न्यायालयापेक्षा कोणीही मोठे नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात दोन याचिका आहेत, एक जनहित याचिका आहे आणि दुसरी माझी याचिका आहे. यापैकी एका प्रकरणाची सुनावणी करताना, मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदानावर कोणतेही आंदोलन करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत.
सदावर्ते म्हणाले, जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसीहा किंवा मास्टरमाइंड असतील त्यानी आता जरांगेंना सांगावे की, आता नो एन्ट्री इन आझाद मैदान.. डंके की चोटपर असा हा आदेश आहे. तो सर्वांना लागू आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. मनोज जरांगे हा काय एवढा मोठा नाही, तो नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. आझाद मैदानात दोन आठवडे काहीही करायचे नाही, न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. तो सर्वांना बंधनकारक असतो, हे जरांगेंनी आपल्या डोक्यात घालून घ्यावं, असं सदावर्ते म्हणाले.