गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकण वासियांना गोड बातमी; मुंबई ते कोकण रो-रो सेवा सुरू होणार

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकण वासियांना गोड बातमी; मुंबई ते कोकण रो-रो सेवा सुरू होणार

Good news for Konkan residents on the eve of Ganesh Chaturthi; Mumbai to Konkan Ro-Ro service to start : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र आणि प्रामुख्याने कोकण वासियांसाठी गोड बातमी समोर आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई ते कोकण रो-रो सेवा सुरू होणार असल्याचं सांगितलं. तसेच याची सविस्तर माहिती देखील त्यांनी दिली.

काय म्हणाले नितेश राणे?

काही महिन्यांपासून मी वारंवार कोकण वसियांना सांगत आहे की, कोकणात जाण्यासाठी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या संकल्पनेची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली. जेव्हा ते २०१४ ला ते मुख्यमंत्री असताना काही दिवस त्यांच्याकडे बंदरे खाते होते. त्यावेळी त्यांची इच्छा होती की, समुद्र मार्गाने कोकणाकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून आपण रो-रो सेवा सुरू करावी.

मोठी बातमी, माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन, अनेक लोक जखमी झाल्याची भीती

यासाठी त्यांनी 2014 ते 19 मध्ये रो-रो सेवेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांची स्वप्नपूर्ती या सरकारच्या कालखंडात होत आहे. त्यांचा कार्यकर्ता आणि मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून मला याचा आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या बंदर खात्याची परवानगी माझ्या हातात आहे. ही परवानगी m2m चालवण्याच्या परवानगी आम्हाला प्राप्त झाली आहे. मोठी वेसल चालवण्यासाठी सगळ्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.

धक्कादायक! जगातील तब्बल 210 कोटी लोक पिताहेत दुषित पाणी; वाचा, संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

यासाठी 147 परवानग्या आम्ही मिळवल्या आहेत. त्यामुळे आमची ही बोट कोकणाच्या दिशेने जायला सज्ज आहे. मात्र सध्या वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे आम्ही काही दिवस थांबण्याचं ठरवलं आहे. आम्हाला कोणत्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाही. कोणत्याही पद्धतीचा त्रास सामन्यांना होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ. समुद्रात मच्छीमार यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा…; CDS चौहान यांचा संदेश, ऑपरेशन सिंदूरविषयी काय म्हणाले?

मुंबई पासून ते रत्नागिरी जयगड आणि विजयदुर्ग तीन तासात लोकांना घेऊन जाणार आहे. पाच ते साडेपाच तासात लोकांना तिथे घेऊन जाऊ. ही दक्षिण आशियातील सर्वात वेगवान स्पीड असलेली बोट असणार आहे. आता अलिबागला जाते ती 15 नॉटची आहे. ही 25 नॉटची आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाआधीच महत्वाची मागणी मान्य… काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

यामध्ये फर्स्ट क्लास, बिसनेस क्लास, प्रीमियम इकॉनॉमी असा कॅटेगरी उपलब्ध आहेत. तसेच या रो-रोचा पहिला स्टॉप जयगड आणि दुसरा स्टॉप विजयदुर्ग असून दोन्हीकडे उतरण्याची सुविधा केली आहे. लवकरच यासाठी ड्राय रन करणार आहोत. गणेशोत्सवपूर्ती नव्हे तर ही सर्व्हिस कायम सलग सुरू करण्याचं नियोजन आहे.

Salman Khan चे 37 वर्ष : हिट चित्रपट, स्टारडम आणि जबरदस्त यशाची प्रेरणादायक कहाणी

इकॉनॉमी 552, प्रीमियम इकॉनॉमी 44, बिसनेस इकॉनॉमी 48, फर्स्ट क्लास 12 अशा सीट आहेत. ज्या प्रवाश्यांसाठी असून वाहनांसाठी देखील दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये इकॉनॉमीसाठी अडीच , प्रीमियम इकॉनॉमी चार हजार, बिसनेस 7 हजार 500 आणि फर्स्ट क्लास 9 हजार, सायकल घेऊन जायचं असेल 600 मिनी बस घेऊन जायची असेल तर 13 हजार 30 सिटर बस 14 हजार 500 45 सीट 15 हजार त्याहून अधिक मोठी बस असेल तर 21 हजार 30 ते 40 वर्षानंतर पुन्हा रो रो सर्व्हिस सुरू होत आहे. त्यामुळे कोकणवासीयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube