मोठी बातमी, माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन, अनेक लोक जखमी झाल्याची भीती

Mata Vaishno Devi : जम्मू आणि काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रियासी (Reasi) जिल्ह्यातील कटरा येथे (Katra) असलेल्या माता वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर (Mata Vaishno Devi) असलेल्या अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ पावसानंतर भूस्खलन झाले. माहितीनुसार, काही लोक यात जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्धकुमवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले आहे आणि बचाव कार्य सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे त्रिकुटा टेकडीवर ही भूस्खलन झाली आहे.
A landslide incident has occurred near Inderprastha Bhojnalaya at Adhkwari, some injuries are feared. Rescue operations are underway along with required manpower and machinery: Shri Mata Vaishno Devi Shrine Board pic.twitter.com/xf2EcqQVtt
— ANI (@ANI) August 26, 2025
तर दुसरीकडे माता वैष्णोदेवी यात्रा सध्या थांबविण्यात आली आहे आहे. अर्धकुंभरी ते भवन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. खालच्या ट्रॅकवरून भाविकांची हालचाल देखील प्रतिबंधित करण्यात आली आहे. यात्रेत असलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येत आहे. पावसामुळे जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहेत.
शाळांमध्ये सुट्टी जाहीर
खराब हवामानामुळे विविध सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 27 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
मुंबईत येणारच, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे ठाम
जम्मू आणि काश्मीर शालेय शिक्षण मंडळाने बुधवारी होणाऱ्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा देखील केली आहे. बीएसएफने माहिती दिली की जम्मूच्या पलौरा कॅम्प येथे होणारी कॉन्स्टेबल (जीडी) भरती परीक्षा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.