शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा…; CDS चौहान यांचा संदेश, ऑपरेशन सिंदूरविषयी काय म्हणाले?

शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहा…; CDS चौहान यांचा संदेश, ऑपरेशन सिंदूरविषयी काय म्हणाले?

CDS Anil Chauhan : मध्य प्रदेशातील महू येथे ‘रण संवाद 2025’ या दोन दिवसीय तिन्ही सैन्यदलांच्या परिषदेत भारताचे संरक्षण दलप्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. शांती हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत (India) नेहमीच शांतीच्या बाजूने राहिला आहे, परंतु, शक्तीशिवाय शांतता केवळ स्वप्नच राहते. त्यामुळं पण शांती टिकवण्यासाठी शक्ती आवश्यक आहे आणि शांती हवी असेल तर युद्धाची तयारी करा, असं ते म्हणाले.

Salman Khan चे 37 वर्ष : हिट चित्रपट, स्टारडम आणि जबरदस्त यशाची प्रेरणादायक कहाणी 

जनरल चौहान यांनी सांगितले की, भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शक्तीशिवाय शांतता ही केवळ एक कल्पनारम्य आहे. भारत एक शांतताप्रेमी राष्ट्र आहे, परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांततावादी मानले जाऊ नये. शांतता राखण्यासाठी शक्ती आवश्यक आहे, असं म्हणत त्यांनी एका लॅटिन म्हणीचा दाखला ते म्हणाले, जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा.

पुढं ते म्हणाले, आजच्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत आहे. सायबर हल्ले, हायब्रिड वॉरफेअर, आणि नवीन तंत्रज्ञानामुळे युद्धक्षेत्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भारताला सज्ज राहावे लागेल.

देहूमध्ये अवतरलं संत तुकाराम महाराजांचं सगुण साकार रूप; ‘अभंग तुकाराम’ च्या कलाकारांची देहू भेट 

जनरल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर आणि येणाऱ्या काळात भारताच्या नवीन संरक्षण प्रणाली सुदर्शन चक्रावरही खुलेपणाने चर्चा केली. ते म्हणाले की, आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी केवळ शांततेची इच्छा पुरेशी नाही, तर त्यासोबतच सामरिक शक्ती आणि तयारी देखील आवश्यक आहे. ते म्हणाले की, सुदर्शन चक्र केवळ देशाच्या लष्करी आणि नागरी स्थळांचे संरक्षण करणार नाही तर ते भारताच्या संरक्षण रणनीतीमध्ये एक नवीन दिशा देखील निश्चित करेल. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सांगितले की, या ऑपरेशनमधून भारताने अनेक धडे शिकले आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे, असं ते म्हणाले.

शेवटी, चौहान यांनी ‘विकसित भारत’साठी ‘शस्त्रसज्ज, सुरक्षित आणि आत्मनिर्भर’ असण्याची गरज व्यक्त केली. ही परिषद भारताच्या संरक्षण धोरणाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी आशा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube