जालना : मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरून जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीसांचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे. हिंदू आणि मराठ्यांच्या नावाखाली यांना सत्ता लागते असेही जरांगे म्हणाले. मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे मोदी आणि फडणवीस यांनी उद्घाटन केले. मात्र, तुम्ही स्मारक बनवू शकले नाही, त्यामुळे तुमचा निषेध आहे. तुम्ही राज्यातील नागरिकांच्या भावनेशी जाणून बुजून खेळत असून, स्मारकाचं भूमिपूजन फक्त नाटक आहे. सरकारने तातडीने स्मारकाचं काम सुरु करून शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करावे अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Manoj Jarange Press)
राष्ट्रवादीच्या कोअर ग्रुपमध्ये छगन भुजबळ, अजितदादांच्या मनात काय?
साखळी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे उद्यापासून (दि.15) सुरू होणारे नियोजित राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. तसेच राज्य सरकारला उर्वरीत दोन मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती. परंतु,राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू करण्यात येणारे राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केले जात असल्याचे जरांगे म्हणासे. मात्र, या 15 दिवसांत म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारने उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा वजा अल्टिमेटम जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपी सरकार सोडून देणार?
यावेळी जरांगेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवरील कारवाई न करण्याची अजित पवार यांची भूमिकेवर भाष्य करत खळबळजनक दावा केला. ते म्हणाले की, जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का? असा सवालदेखील यावेळी जरांगेंनी उपस्थित केला.
बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण
धनंजय मुंडेंसाठी शरमेची बाब
यावेळी जरांगेंनी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणावर भाष्य करत महादेव मुंडे यांच्या पत्नीने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. यावर बोलताना धनंजय मुंडेंची भावजय असताना आंदोनक करण्याची वेळ यावी ही धनंजय मुंडेंसाठी शरमेची बाब असून, गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचेही यावेळी जरांगेंनी सांगितले.