Video : आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत ट्विस्ट; पंकजांच्या भेटीने समीकरणं बदलणार?

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे.

Letsupp Image   2024 07 30T131919.225

Letsupp Image 2024 07 30T131919.225

लातूर : एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजांची भेटीने आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत मोठा ट्विस्ट आला आहे. या दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे विधानसभेपूर्वी राज्याच्या राजकारणात नव्या नांदीच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Pankaja Munde Meets Prakash Ambedkar During Arakshan Bachav Yatra)

मराठा आरक्षणावर तोडगा! मुख्यमंत्री शिंदे-शरद पवारांमध्ये गुप्तगू; चर्चेत काय घडलं?

नेमकी भेट कशी झाली?

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी नुकतचं ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं. या सर्व घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलं आहे.

आरक्षण बचाव यात्रेनिमित्त प्रकाश आंबेडकर हे काल (दि.29) दिवसभर लातूरमध्ये होते. तर, भाजप आमदार पंकजा या लातूरहून बीडकडे निघाल्या होत्या. याचवेळी या दोन्ही नेत्यांची बीड आणि लातूरच्या मध्ये अचानक भेट झाल्याचे सांगितले जाते. भेटीवेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी काहीकाळ संवाद साधला. त्यामुळे राज्यातील विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा नव्या राजकीय नांदीची सुरूवात होणार अशा चर्चांनी जोर धरला आहे.

वेशांतर करून अजितदादांची शहांसोबत भेट; सुळेंच्या मागणीने एअरपोर्ट अधिकारी गोत्यात येणार?

आंबेडकरांचे पवार, मुंडेंना पत्र

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैपासून मुंबई, चैत्यभूमी येथून सुरू झाली. आरक्षण बचाव यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी आंबेडकरांनी शरद पवार, पंकजा मुंडेंसह अनेक दिग्गज नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. यासाठी त्यांनी पत्रदेखील लिहिले होते. त्यामुळे त्यात आता आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा मराठवाड्यात दाखल होताच पंकजा आणि आंबेडकरांची भेट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

7 ऑगस्ट रोजी होणार समारोप

आरक्षण बचाव यात्रेसाठी निघालेल्या आंबेडकर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना करत 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

Exit mobile version