Sanjay Sirsat On Hotel Vits Auction : छ. संभाजीनगर येथील विट्स हॉटेल लिलावाची आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाची जोरदार चर्चा आहे. मात्र, आता विट्स हॉटेलच्या लिलावात ट्विस्ट आला असून, संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी या लिलावातून माघार घेणार असल्याचे सांगितले आहे. हॉटेलच्या लिलावात शिरसाट यांचा मुलचा सहभाग होता परंतु, यात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी शिरसाट यांच्यावर केला होता. या आरोपालाही शिरसाटांनी थेट आव्हाव दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
लाडकी बहीण योजनेत अनेक चुका, अपात्र महिलांवर कारवाई होणार? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
पत्र देऊन बाहेर पडायला लावतो
पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो. परंतु हे जे दलाल फिरत आहेत ते कोणासाठी फिरत आहेत त्याचा छडा लावा. उद्या माझ्या मुलाला त्या हॉटलसाठी जी टेंडरची प्रक्रिया आहे त्यातून पत्र द्यायला सांगून या प्रकरणातून बाजूला होतोय असे सांगायला लावतो. माझं विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी आता या लिलावात सहभाग घेऊन हॉटेल विकत घेऊन दाखवावं. तुम्ही हॉटेल खरेदी केलंत तर तुमच्या स्वागताला येईन. असे आरोप करण्यापूर्वी दहावेळी विचार करत जा, असेही शिरसाट म्हणाले.
Video : लग्नाला 40 वर्ष… अजित पवारांचं घरातील नाव सांगताना सुनेत्रा पवारांनाही आवरेना हसू….
संजय राऊत मूर्ख माणूस
छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये असताना, ते केवळ ६७ कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी राऊत यांना मूर्ख माणूस म्हणत विट्स हॉटेलचा लिलाव न्यायालयाच्या आदेशाने झाला” असे स्पष्टीकरण दिले होते.
लिलाव होण्याची ही पहिली वेळ नसून ही आठवी वेळ होती. तसंच 67 कोटी जी काही रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टानेच सांगितलेली रक्कम होती. मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाइटमध्ये दिसेल. 110 कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? 67 कोटी रुपयांचा रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या, असेही शिरसाट म्हणाले.
Video : राऊतांपासून एका महिलेला मूल; शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
मी थोडा चक्रम माणूस, आग लावायलाही… राऊतांना थेट इशारा
राऊतांवर हल्लाबोल करताना शिरसाटांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले की, उद्या माझा मुलगा या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडतोय. व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात संजय राऊत तुम्ही खोडा घातला आहे. मराठी माणूस उभा राहत होता. मात्र, तुम्ही ते होऊ दिलं नाही. तुम्ही वैयक्तिक जात असाल तर, मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावं लागेल. कारण, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी सुद्धा सगळ्या गोष्टी काढेन असा इशारा देत मी थोडा चक्रम माणूस आहे. घराला आग लावायलाही कमी करणार नाही. राऊतांना ब्रिफिंग कुणी केलं ते चुकीच केलं असल्याचेही शिरसाटांनी यावेळी सांगितले.