रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (दि.12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये असून, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे काही मागण्या ठेवत त्याची घोषणा करण्याची विनंती केली आहे. या मागण्यांमध्ये उदयनराजे यांनी शाहंकडे दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावे तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेबांचा होणारा अवमान टाळण्यासाठी एक कायदा करून यात दोषींना कमीत कमी 10 वर्ष जामीन मिळू नये असा कायदा करण्याची मागणी केली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी नेमकं त्यांच्या भाषणात शाहंसमोर कोण कोणत्या मागण्या मागितल्या ते पाहूया. (Udayanraje Bhosale Speech In Raigad Fort)
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर खासदार उदयनराजेंचा संताप, केली ‘ही’ मोठी मागणी
उदयनराजेंच्या मागण्या काय?
रायगडावर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उदयनराजे म्हणाले की, आज आपण सर्वजण थोर व्यक्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी जमलो आहोत. शिवरायांनी समता आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. युगपुरुष शिवरायांनी नेहमी लोकांचा विचार केला. त्यांच्यासाठी आयुष्य वेचले. लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा, हे शिवरायांनी केल्याचे ते म्हणाले.
1. लोकशाहीची मूळ पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. ज्या शिवरायांनी आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला. मात्र, त्यांचा अवमान केला जात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मी देशाच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेबांचा होणारा अवमान टाळण्यासाठी एक कायदा करावा. त्यात दोषींविरूद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करून दहा वर्ष जामिनच मिळू नये अशी मागणी करतो. तसेच शिवाजी महाराज यांचा शासनमान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावा असेही ते म्हणाले.
2. सिनेमॅटीक लिबर्टीबाबत एक सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे. एखादा लेखक स्वतःच्या कल्पनेतून कादंबरी लिहितात. मात्र, त्यात कुठलेही पुरावे नसतात. त्यामळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबद्दल समाजात गैरसमज निर्माण होतात. हे टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे.
उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले
3. जशी रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं. कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी असल्याचे उदयनराजे म्हणाले.
4. शहाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांमध्ये उतरवला. शहाजी महाराजांची समाधी दावणगिरी येथे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.
5. मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन झाले. गव्हर्नर हाऊसला लागून 48 एकर जागा आहे. तिथे शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे.
6. निजामशाही, मुगलशाहीत शाहजी महाराजांनी त्यांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता, माँ साहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या अंगी तो विचार उतरवला. दावणगिरी जिल्ह्यात शाहजी राजेंची समाधी आहे. या समाधीला केंद्र आणि राज्य सरकारने पुरेसा निधी द्यावा अशी मागणीही यावेळी उदयनराजेंनी केली.