Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयाच गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत टिळेकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. या निवडणुकीत एकूण 11 जागा रिक्त होत्या. या अकरा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. आज मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत भाजपचे योगेश टिळेकर 26 मते घेत विजयी झाले. या निवडणुकीत विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
MLC Election : काँग्रेसचे चार आमदार फुटणार?, दोघांनी रात्रीच कल्टी मारली
उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क झाले होते. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले होते. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती होती. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. मतदानाच्या दिवशी म्हणजे आज या आमदारांनी हॉटेलातून थेट सभागृह गाठले.