Download App

डिजिटल मंत्रिमंडळासाठी फडणवीस सरकारचा कोटींचा घाट; पण, RTI कार्यकर्ते कुंभारांनी ठेवलं ‘मर्मा’ वर बोट

Vijay Kumbhar On Maharashtra’s E-cabinet : देशातील वाटचाल आता डिजीटल युगाकडे होत असून केंद्र सरकार (Central Government) देखील

  • Written By: Last Updated:

Vijay Kumbhar On Maharashtra’s E-cabinet : देशातील वाटचाल आता डिजीटल युगाकडे होत असून केंद्र सरकार (Central Government) देखील यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने देखील “ई-कॅबिनेट प्रणाली” पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी 50 ॲपल आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 1 कोटी 16 लाख 65 हजार रुपये खर्च येणार आहे. सरकारच्या या निर्णयावर आता RTI कार्यकर्ते आणि महाराष्ट्र आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत फडणवीस सरकारवर (Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे.

त्यांनी ट्विट करत राज्य सरकारमधील अनेक मंत्री अजूनही अधिकृत ईमेल आयडी वापरत नाहीत मात्र तरीही सरकार “ई-कॅबिनेट प्रणाली” पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी सरकारने 50 ॲपल आयपॅड खरेदी करणार आहे. अशी टीका केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या “ई-कॅबिनेट”साठी “हाय-टेक” आयपॅड! महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री अजूनही अधिकृत ईमेल आयडी वापरत नाहीत.मात्र “ई-कॅबिनेट प्रणाली” पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी सरकारने 50 ॲपल आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय! यासाठी खर्च 1 कोटी 16 लाख 65 हजार रुपये येणार आहे. सरकार म्हणतं आहे. डिजिटल मंत्रिमंडळ हवंय. हरकत नाही. मात्र मंत्रीही लवकरच डिजिटल साक्षर होतील अशी अपेक्षा करूया, आता तरी सर्व मंत्री अधिकृत ईमेल आयडी वापरतील आणि “स्मार्ट” निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया.

अशी टीका त्यांनी या ट्विटमध्ये राज्य सरकारवर केली आहे. RTI कार्यकर्ते आणि महाराष्ट्र आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी या ट्विटसोबत राज्य शासनाचा एक जीआर देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे.

UPI मार्फत व्यवहार करणाऱ्यांसाठी RBI ने दिला ‘हा’ मोठा आदेश

follow us