Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला

Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला

Devendra Fadanvis Criticize Sharad Pawar on Ajit Pawar statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन विभागांचा 100 दिवसांचा मान्य करण्यात आलेल्या कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीतील प्रगतीबाबत आढावा आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकित घेण्यात आला. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, अजित पवारांनी म्हटले आहे की, काकांच्या आशीर्वादाने त्यांचं सगळ चांगलं सुरू आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोठ्यांचे अशीर्वाद घेतले पाहिजे. मोठ्यांच्या अशीर्वादाने सर्व काही चांगलं होतं. पण तुम्ही हे लक्षात घ्या की, अजित पवारांनी काकांना फक्त अशीर्वादा पुरतेच मर्यादेत ठेवले आहेत. असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

वक्फ बोर्ड बिल ते लाडकी बहिण योजना; काँग्रेसकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे

तर यावेळी फडणवीसांनी वक्फ वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंडण्यात आले असून ते निश्चितपणे पास होणार. तसेच वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. वक्फ विधेयक समाज्याच्या विरोधात नाही, धर्माच्या अस्थेविरोधात नाही. सद्सद् विवेकबुद्धि असणारे विधेयकाला समर्थन करतील. विरोधकांना लांगूनचालन करायचा असल्याने विधेयकाला विरोध करीत आहेत. मतांच्या तृष्‍टीकरणासाठी विरोधकांचा विरोध आहे. अशी प्रतिक्रीया दिली आहे.

अखेर कुणाल कामराने माफी मागितली पण… समन्स बजावलेल्या प्रेक्षकाला दिली खास ऑफर

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ संशोधन विधेयक 2024 लोकसभेत (Waqf Amendment Bill 2024) सादर केले आहे. मंत्री रिजिजू यांनी विधेयक सादर करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विधेयक सादर केल्यानंतर बोलताना रिजिजू यांनी हे विधेयक आणणं का महत्वाचं होतं हे देखील स्पष्ट केलं.

रिजिजू म्हणाले, आज जर आम्ही वक्फ संशोधन विधेयक आणलं नसतं तर संसद भवन देखील वक्फ बोर्डाची संपत्ती झाले असते. संसद भवनावरही वक्फने द दावा केला आहे. यूपीए सरकारने त्यांच्या काळात दिल्लीतील 123 संपत्ती वक्फला देऊन टाकल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube