अखेर कुणाल कामराने माफी मागितली पण… समन्स बजावलेल्या प्रेक्षकाला दिली खास ऑफर

अखेर कुणाल कामराने माफी मागितली पण… समन्स बजावलेल्या प्रेक्षकाला दिली खास ऑफर

Kunal Kamra Apologies to Audiance of his Show and give offer : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात नवीन घडामोड (Kunal Kamra) समोर आली आहे. कुणाल कामराच्या नया भारत या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. त्यातून अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कुणाल कामराने या प्रेक्षकाची माफी मागत थेट एक ऑफर दिली आहे.

काय आहे कुणाल कामराची ऑफर?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला विविध प्रेक्षक मोठी गर्दी करत असतात. त्यात नुकताच त्याचा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण यामध्ये शिवसेनेच्या बंडावर एकनाथ शिंदेंवर विडंबन करण्यात आले होते. त्यामुळे केवळ कुणाल कामरालाच नाही तर आथा थेट या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यात एक बॅंकर असलेल्या प्रेक्षकाला मोठी अडचण निर्माण झाली आहे.

धक्कादायक! सुनेनं केली सासूची हत्या…मृतदेह गोणीत भरला, जालन्यात भयंकर घडलं

कारण त्यांना केरळला फिरायला जायचे असताना हे समन्स बजावण्यात आल्याने टुर रद्द करत मुंबईत परतावे लागले. तर आपल्या प्रेक्षकाला अशा प्रकारे आपल्या शोमुळे अडचणीला सामोरे जावे लागल्याने कुणाल कामराने सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे. तसेच त्याने या बॅंकर असलेल्या प्रेक्षकाला रद्द झालेल्या टुरवर परत जाण्याची ऑफर दिली आहे.

चित्रपट प्रदर्शित करुनच दाखवा, खुलं चॅलेंज; पाकिस्तानी चित्रपटावरुन मनसे आक्रमक

त्यासाठी आपल्याला मेल करावा. जेणे करून मी तुमची टूर पुन्हा नियोजित करू शकतो असं ते म्हणाले आहेत. यावर बोलताना कामरा म्हणाला की, माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. कृपया मला ईमेल करा जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही शेड्यूल करू शकेन. असं कामरा म्हणाला आहे.

Video : राख गँग, जातीय वाद अन् चुलत्यांची कृपा; धनुभाऊंच्या गैरहजेरीत दादांनी घेतली बीडकरांची ‘शाळा’

दरम्यान या प्रकरणी भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वायपी सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या या कार्यवाहीने प्रेक्षकांत भीतीचे वातावरण आहे. कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळेस समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अजूनही हजर झालेला नाही. दरम्यान, कुणाल कामराने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे एक विडंबन गीत सादर केले होते. याचे संतप्त पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube