धक्कादायक! सुनेनं केली सासूची हत्या…मृतदेह गोणीत भरला, जालन्यात भयंकर घडलं

धक्कादायक!  सुनेनं केली सासूची हत्या…मृतदेह गोणीत भरला, जालन्यात भयंकर घडलं

Daughter In law killed Mother In Law In Jalna : मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Jalna) वाढत आहे. असं असताना आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर (Crime News) आलंय. सविता संजय शिंगारे, असं हत्या झालेल्या 45 वर्षीय महिलंच नावं आहे. तर प्रतीक्षा शिंगारे असं आरोपी (Daughter In law killed Mother In Law) असलेल्या सूनेचं नाव आहे.

सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करून घरात सून (Daughter In law) म्हणून आलेल्या सुनेनं सासूची हत्या (Mother In Law Murder) केल्याची ही धक्कादायक घटना जालन्यातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली. सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश शिंगारेचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतिक्षा या मुलीशी प्रेम विवाह झाला होता होता. प्रेम विवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता.
Video : राख गँग, जातीय वाद अन् चुलत्यांची कृपा; धनुभाऊंच्या गैरहजेरीत दादांनी घेतली बीडकरांची ‘शाळा’

नोकरी निमित्त आकाश लातूरला असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा ह्या दोघी घरी एकट्या होत्या. याच संधीचा फायदा घेत प्रतीक्षाने रात्री सासूचा क्रूरपणे खून करून त्यांचा मृत्यूदेह गोणीत भरला. प्रतीक्षा हा मृत्यदेह घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र गोणीतील मृतदेह घेऊन जाता आला नसल्याने ती फरार झालीय. घर मालकाला सकाळी संशय येताच घरमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिलीय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सविता यांचा मृत्यदेह घरात गोण्यात भरलेल्या अवस्थेत आढळून आलाय.

शिट्टी वाजली रे! अमेय वाघ होस्टच्या भूमिकेत, ‘या’ तारखेपासून कॉमेडीची होणार फ्री होम डिलिव्हरी

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केलाय. प्रथमदर्शनी मृत सविता यांच्या डोक्यावर मार लागल्याचं दिसून येतं. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सून प्रतीक्षाचा शोध सुरू केला असून सूनेने आपल्या सासूला इतक्या निर्घृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. मात्र, प्रेमविवाह करुन घरी आलेल्या सूनेनेचं इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाल्याची माहिती मिळतेय, तर साथीदाराच्या दुचाकीवर बसून प्रतीक्षा फरार झाल्याचं समोर आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube