चित्रपट प्रदर्शित करुनच दाखवा, खुलं चॅलेंज; पाकिस्तानी चित्रपटावरुन मनसे आक्रमक

चित्रपट प्रदर्शित करुनच दाखवा, खुलं चॅलेंज; पाकिस्तानी चित्रपटावरुन मनसे आक्रमक

येत्या काही दिवसांत पाकिस्तानी चित्रपट अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या रिलीजला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडाडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही भारतात चित्रपट रिलीज करुनच दाखवा, माझं खुलं चॅलेंज असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलंय. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना खोपकर म्हणाले, 2016 साली देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली होती. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देणआर नाही असं सांगण्यात आलं होतं, आता कोणीही हिम्मत करावी चित्रपट प्रदर्शित करण्याची आम्ही तसं होऊ देणार नाही, चित्रपट रिलीज झाला तर काय होऊ शकतं पाहा असा इशाराच खोपकर यांनी दिलायं.

तसेच आता धमक्या देणं सुरु झालंय ट्विटरच्या माध्यमातून आम्ही भीक घालत नाही, आ्म्ही भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानी चित्रपटाचा आम्ही विरोधच करणार, कोणीही पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित करु नये, माझं चॅलेंज आहे तुम्ही चित्रपट प्रदर्शित करुन दाखवा, भारतावर हल्ले होत असताना पाकिस्तानी चित्रपट कशाला हवेत, हल्ले होतात तेव्हा हे कलाकार शांत बसतात इतर ठिकाणी होतात तेव्हा बोलतात. आपल्याला पाकिस्तानी कलाकारांची गरजच नाहीये, हल्ले जेव्हा थांबतील तेव्हा पाहू, असंही खोपकर यांनी स्पष्ट केलंय.

मनसेची भूमिका काय?
सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी (Ameya Khopkar) म्हटलंय की, पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.

‘अबीर गुलाल’ हा पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित होऊच देणार नाही, असा इशारा मनसेच्या अमेय खोपकर यांनी दिलाय. तर बऱ्याच काळानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. ‘अबीर गुलाल’ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या, परंतु सामना आमच्याशी आहे, असा इशाराच अमेय खोपकरांनी दिलाय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube