Download App

मनोरमा खेडकर पुन्हा गायब, बंगल्यावरील नोटीसही फाडली अटकपूर्व जामीन रद्द होणार?

Manorama Khedkar जामीनानंतर पोलीसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी गायब झाल्या आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.

Vijay Kumbhar On Manorama Khedkar again Disappear during Anticipatory bail : वादग्रस्त निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) आई मनोरेमा खेड़करने मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सहकार्य न करता आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याने त्यांच्यावर चतुर्श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रबाळे अपहरण प्रकरणात मनोरेमा खेड़करला 30 सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला. पण त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. मात्र त्या जामीन मिळाल्यानंतर पोलीसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी पुन्हा एकदा गायब झाल्या आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. यावर त्यांचा जामीन रद्द का केला जाऊ नये? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

काय म्हणाले विजय कुंभार?

पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जातील पत्त्यावर (पुन्हा) नोटीस चिकटवली आहे. रबाळे अपहरण प्रकरणात मनोरेमा खेड़करला 30 सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला आहे. पण या अर्जात तिने “कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही” असा दावा करत, चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध दाखल झालेला ताजा गुन्हा पूर्णपणे लपवला आहे.

https://x.com/vijaykumbhar62/status/1974334806574944602?s=46

मोदींना टाटा,बाय-बाय करा, ओबीसींचा घात भाजप अन् आरएसएसनेच केला; आंबेडकरांचा सल्ला

त्यात 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी पुण्यात छापा टाकला असता, मनोरेमा खेड़करने पोलिसांना अडथळा आणल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात ती मुख्य आरोपी असून सध्या फरार आहे. दरम्यान पुणे व नवी मुंबई पोलिस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तिच्या जामीन अर्जातील पत्त्यावर नोटीस चिकटवली आहे. तरी सुद्धा ती अद्याप बेपत्ता आहे.

राज्यावर पुन्हा घोंगावतयं संकट! मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

दुसरीकडे जामीनाच्या अटी या तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावणे, पत्ता बदलल्यास तात्काळ कळवणे, तपासात सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे अशा प्रकराच्या असताना ती अद्याप बेपत्ता आहे. त्यामुळे ती जर तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाली, तर चतुश्रुंगी प्रकरणात तिची अटक होण्याची शक्यता आहे.तसेच, जामीन अर्जात एफआयआर लपवल्यामुळे न्यायालय तिचा जामीन रद्द करण्याचाही विचार करू शकते. पण कायद्यापुढे सर्व समान आहेत का? की काहींना विशेष सवलती मिळतात? असा सवाल या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

वादग्रस्त निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) आई मनोरेमा खेड़करने मिक्सर ट्रकचालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सहकार्य न करता आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याने त्यांच्यावर चतुर्श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रबाळे अपहरण प्रकरणात मनोरेमा खेड़करला 30 सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन मिळाला.पण जामीनानंतर त्या गायब झाल्या आहेत. नियमानुसार त्यांनी जामीनावर असताना देखील तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावणे, पत्ता बदलल्यास तात्काळ कळवणे, तपासात सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे गरजेचे होते पण त्या गायब झाल्या आहेत. त्यांच्या बंगल्यावर लावलेली नोटीसही फाडली आहे. त्यामुळे आता मनोरमा खेडकरचा जामीन रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

follow us