Vijay Vadettivar on Sudhir Mungantivar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडसह राज्यामधील वातावरण तापलं आहे. त्यावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून देखील टीका टीपण्णी केली जात आहे. त्यात आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडच्या प्रकरणावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एक वक्तव्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते.
फक्त लाथ घातली हे चुकलं, गोळ्या घालायला पाहिजे होत्या; चंद्रहार पाटलांचा महाराष्ट्र केसरीवरून वार
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल चंद्रपूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाही बरं’, असं म्हटलं म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसते की, बीड कीती भयावह आहे. असा दावा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनील केला त्यावर लगेचच सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.
Video : ‘मेक इन इंडिया’ बेरोजगारी अन्…; मोदींना सुनावतांना राहुल गांधींचा काँग्रेसलाही घरचा ‘आहेर’
यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोललो. मी त्यातून बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही. असं म्हणतो म्हणजे पुर्ण बिहार वाईट नाही. त्याच प्रमाणे मी फक्त बीडच्या घटनेवर बोललो आहे. त्यातून बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही. असं मुनगंटीवार म्हणाले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडमधील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावरही आरोप होत आहेत.