अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले

Ashok Kharat case मध्ये धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

Vijay Vdettivar Sensational Claim on Ashok Kharat case Chandrashekhar Bavankule angree : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे एकामागून एक थर आता उलगडत चालले आहेत. त्याच्याविरोधात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या एसआयटी चौकशीने वेग घेतला असून, तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

अशोक खरात हा जरी मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची नावं ही कोड भाषेत लिहीत असला तरी देखील या प्रकरणामध्ये जे काही भोंदूची सोवा करणारे मंत्री, आमदार आणि अधिकारी आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. पेन ड्राईव्हमध्ये 1 हजारहून अधिक व्हिडीओ आहेत. यामध्ये ज्या महिला आहेत. त्यांना या खरातकडे पाठवणाऱ्या त्यांच्या नवऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. राज्याची इज्जत काढणारं हे प्रकरण आहे. तरी देखील राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही हे मोठं दुर्दैवं आहे. चाकणकर एकट्या नाही तर ज्यांचे ज्यांचे खरातसोबत फोटो आहेत. त्या सर्वांवर कारवाई केली जावी.

इंधनटंचाईत दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता पेट्रोल पंपावरच मिळणार रॉकेल

तसेच खरात हा मंत्र्‍यांचे काळे पैसे पांढरे करायचा. म्हणून त्याच्या फोनमध्ये मंत्र्‍यांची नावं सांकेतिक भाषेत लिहीलेली होती. तसेच खरात हा अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या बायका एकमेकांना शेअर करायला सांगायचा असा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

आपल्या कोणत्याही बोलण्याने चौकशीवर दबाव येऊ नये. याची काळजी वडेट्टीवारांनी घेतली पाहिजे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये बाईट न देता तुमच्या जवळ काय पुरावे आहेत त्याचं पत्र वडेट्टीवारांनी संध्याकाळ पर्यंत मला द्यावं. कोणत्याही अधिकाऱ्यांबद्दल वाईट बोलू नये. त्यापेक्षा गोपनीय माहिती सरकारकडे द्या. असे आरोप करून वडेट्टीवारांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करू नये. तसेच वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकऱ्याची नावं द्यावीत. त्यांच्यावर सरकार कारवाई करेल.

Exit mobile version