इंधनटंचाईत दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता पेट्रोल पंपावरच मिळणार रॉकेल

आतापर्यंत रॉकेल प्रामुख्याने रेशन दुकानांमधून मिळत होते. मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपांवरून देखील रॉकेल खरेदी करता येणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 3

Kerosene will be available only at petrol pumps : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनटंचाईची समस्या गंभीर होताना दिसत आहे. या युद्धामुळे कच्चे तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट परिणाम भारतातील नागरिकांवर देखील होत आहे. अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडरसाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत, तर काही ठिकाणी पुरवठा उशिरा होत असल्याने नागरिकांची गैयरसोय वाढली आहे.

याच परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने रॉकेल संदर्भात महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रॉकेल प्रामुख्याने रेशन दुकानांमधून मिळत होते. मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपांवरून देखील रॉकेल खरेदी करता येणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांच्या निवडक परट्रॉल पंपांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

एलपीजीचा तुटवडा लक्षात घेता पर्यायी इंधन म्हणून रॉकेल सहज उपलब्ध व्हावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. रॉकेलच्या साहाय्याने स्टोव्हवर स्वयंपाक करता येणार असल्याने अनेक कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम सुरक्षा आणि परवाना नियमांमध्ये देखील तात्पुरती शिथिलता आणली आहे. नव्या नियमांनुसार, ज्या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रॉकेल पुरवठा होत नव्हता, त्या राज्यांमध्ये देखील आता ही सेवा सुरू केली जाणार आहे. यात दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.

एकूण 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन पेट्रोल पंपांवर रॉकेल वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर जास्तीत जास्त 5000 लिटरपर्यंत रॉकेल साठवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे इंधनटंचाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

follow us