तुमची काही तक्रार आहे का?, कोर्टाच्या प्रश्नावर भोंदू खरातचं एकाच वाक्यात उत्तर

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

News Photo   2026 03 29T220428.912

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी (Nashik) आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाच्या कक्षात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. अशोक खरातला न्यायाधीशांसमोर हजर करताच, न्यायमूर्तींनी त्याला एक प्रश्न विचारला. तुमची काही तक्रार आहे का? या प्रश्नावर खरातने केवळ एका शब्दात “नाही” असं उत्तर दिलं.

सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना, शोक खरात हा या संपूर्ण गुन्ह्याचा ‘मास्टरमाईंड’ आहे. तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपी तपासात सहकार्य करत नसून त्याच्या मोबाईलमधील अनेक गोष्टी कोडवर्डमध्ये आहेत. या कोडवर्डचा उलगडा करण्यासाठी आणि त्याला समोर बसवून चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी असाही आरोप केला की, खरात महिलांना काही विशिष्ट पाणी किंवा द्रव्य देत होता, त्यामागील सत्य शोधणं गरजेचे आहे.

अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; मोबाईलमधील राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने आणि मोठ्या लोकांशी संबंधांची चौकशी

आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे राजकीय कनेक्शन. खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जात असून, त्याने काही राजकीय व्यक्तींची नावे ‘डमी’ स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. दुसरीकडे, अशोक खरातच्या वकिलांनी वाढीव कोठडीला विरोध केला, परंतु पीडित महिलांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत जास्त कोठडीची मागणी केली.

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

follow us