राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 1

SP Tushar, accused in Satara ZP riot case, on compulsory leave : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी राज्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडाली असून या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर हा वाद चिघळला होता. या घटनेत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी जोर धरत होती.

तुमची काही तक्रार आहे का?, कोर्टाच्या प्रश्नावर भोंदू खरातचं एकाच वाक्यात उत्तर

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता प्राथमिक पातळीवर कारवाई करत दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तुषार दोषी हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी पोलिसांनी निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us