Vijay Wadettiwar supports Bhaskar Jadhav for Opposition Leader : कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोकणातील शिक्षण घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जाब विचारला असून, शिक्षण विभागातील भरतीप्रकरणात सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या संस्थाचालकांचा सहभाग असल्याचा थेट आरोप केला (Maharashtra Politics) आहे.
नियतीनं काय ठरवलंय?
विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावाचा विचार झाला आहे, मात्र नियतीनं काय ठरवलंय हेही (Opposition Leader Post) बघावं लागेल.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीची मागणी
हे प्रकार कोकणात घडतायत. योगेश कदम तिथलेच आहेत, त्यांनी यावर मौन बाळगू नये. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, ते सरसकट शिक्षण घोटाळ्याबाबत बोललेले नाहीत, पण बोगस शाळांच्या ID वापरून भरती झाल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर अधिकार्यांना हाताशी धरून मोठा गैरव्यवहार झाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी अन्नदात्याच्या प्रश्नालाही विधानसभेत पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. महाविकास आघाडीची बैठक होणार असून, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीची मागणी आक्रमकपणे मांडली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..
फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले, गुजरातमधील लोक सीबीएसई शाळांमध्ये शिकतात म्हणून त्यांना भाषेचा अभिमान नाही, असं म्हणणं योग्य नाही. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवण्याचा आणि शिकण्याचा अधिकार आहे. भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. सभागृहात कोणी पुरावे दाखवत नाही, पण नाना पटोले यांनी धाडस केलं म्हणजे काही ना काही त्यांच्याकडे पुरावे असणारच.
सावधान! पावसाचा जोर वाढणार, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट
घोटाळ्यांचे आरोप
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांवर बोलताना त्यांनी सूचक टोला लगावला, कोण कुठे जातं हा त्यांचा प्रश्न असतो. पण कुणाल पाटील यांना कुठे बसवतात, हे बघावं लागेल. त्यांच्या आजोबांना काय वाटलं असतं, याचा विचार त्यांनी जरूर करावा. संजय राऊत आणि सुनील शेळके यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले, घोटाळ्यांचे आरोप केले तर रांग लागेल. कारण सत्तेवर आले की सगळे स्वच्छ होतात, हीच दुर्दैवाची स्थिती आहे.