बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..

India US Trade Deal 2025 : अमेरिकेत आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन (India US Trade Deal 2025) सिनेट लिंडसे ग्रॅहम यांनी सांगितले की अमेरिकी सिनेटमध्ये एक विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा (Donald Trump) पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. या विधेयकांतर्गत जे देश रशियाबरोबर व्यापार करणे सुरुच ठेवत आहेत अशा देशांवर तब्बल 500 टक्के टॅरिफ लादला जाऊ शकतो. यात भारत आणि चीनचाही समावेश आहे. कारण, अमेरिकेच्या विरोधानंतरही या दोन्ही देशांनी रशियाबरोबरील आपला व्यापार बंद केलेला नाही.
ABC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ग्राहम यांनी सांगितले की जर तुम्ही रशियाकडून (India Russia Trade) वस्तू खरेदी करत असाल पण युक्रेनची (Ukraine Crisis) काहीच मदत करत नसाल तर त्या संबंधित देशाच्या वस्तूंवर अमेरिका 500 टक्के शुल्क आकारील. भारत आणि चीन दोन्ही देश रशियाकडून 70 टक्के तेल खरेदी करत आहेत आणि हेच तेल रशियाच्या युद्ध मशीनला जिवंत ठेवत आहेत असा आरोप ग्राहम यांनी केला.
आयफोन निर्मितीसाठी भारतच फायद्याचा ; डोनाल्ड ट्रम्प यांना वृत्तपत्राने कसे तोंडावर पाडले ?
भारत-चीनवर होणार परिणाम
नवीन विधेयक ऑगस्ट महिन्यात सिनेटमध्ये सादर केले जाऊ शकते. जर या बिलाला मंजुरी मिळाली तर याचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसू शकतो. कारण दोन्ही देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारत रशियाचा तिसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार बनला आहे. युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्षात भारताने रशियाकडून जवळपास 49 अब्ज युरो किंमतीचे तेल खरेदी केले आहे. याआधी भारत प्रामुख्याने मध्य पूर्वेतील देशांकडून तेल खरेदी करत होता. परंतु, फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून तेल खरेदी वेगाने सुरू केली होती.
फार्मा, टेक्सटाइल आणि आयटी सेवा धोक्यात
जर या विधेयकाला मंजुरी मिळाली तर फक्त तेल उद्योगावरच नाही तर औषधे, टेक्सटाइल्स आणि आयटी सेवांना अमेरिकेतील बाजार प्रवेशावर टॅरिफचा सामना करावा लागू शकतो. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यात आणि रोजगारावर पडू शकतो.
भारत अमेरिकेत नेमकं काय चाललंय
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील मोठा व्यापार करार जवळपास निश्चित मानला जात आहे. अमेरिकी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी मंगळवारी सांगितले की हा करार अंतिम टप्प्यात आहे. काही मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारताच्या मागण्यांवर अडकली आहे. वॉशिंग्टनमध्ये भारतीय प्रतिनिधीमंडळ अमेरिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर या मुद्द्यावर चर्चा करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! अमेरिकेत स्टीलच्या आयातीवर दुप्पट टॅरिफ; चीनचा व्यापार थंडावणार