विरोधकांच्या घरी स्नेहभोजन,शिर्डीत विखेंनी डाव टाकला; विखेंच्या पॅनलला घाम फोडायला लावणाऱ्या आरणे भाजपात येणार?

Vikhe शिर्डी नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी विखेंच्या पॅनलला घाम फोडायला लावणाऱ्या आरणे यांच्या घरी माजी खासदार सुजय विखे यांनी स्नेहभोजन केलं.

Sujay Vikhe

Sujay Vikhe

Vikhe dinner at opposition’s house, Shirdi Will Kalyani Arane join the BJP : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विखे यांच्या पॅनलला घाम फोडायला लावणाऱ्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करणाऱ्या डॉ कल्याणी आरणे यांच्या घरी माजी खासदार सुजय विखे यांनी स्नेहभोजन केलं. मात्र हे सगळं झालं असलं तरी या भेटीला कोठेतरी राजकीय किनार असल्याचे देखील त्यामागे स्पष्ट झाले. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, यामुळे येणाऱ्या काळात आरणे या भाजपात दिसतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

डॉ कल्याणी आरने नेमक्या आहेत तरी कोण?

शांत, संयमी व साधी राहणीमान अशी कल्याणी आरणे यांची ओळख. अनेक वर्षांच्या लोकसंपर्कातून आणि सातत्यपूर्ण जनसेवेतून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, तसेच रस्ते-विकास यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. ​एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करत वैद्यकीय क्षेत्रात आणि त्यानंतर राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केल्याने त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.

सुजय विखेंकडून कौतुक

एका सामान्य कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करत स्वतःची ओळख त्यांनी केली ते खरच कौतुकास्पद असल्याचे माजी खासदार सुजय विखे म्हणाले. समाजातील कष्टकरी घटकांमधून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, ​या ‘सदिच्छा भेटी’मुळे शिर्डीतील राजकीय कटुता संपून विकासाचे एक नवे पर्व सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत…

या भेटीनंतर डॉ. आरणे म्हणाल्या…भाजप पक्ष हा विशिष्ट विचारधारेवर आणि संस्कृतीवर चालणारा पक्ष आहे. शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास आम्ही ती नक्कीच स्वीकारू, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप एकच आहे, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी आगामी काळात विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Exit mobile version