‘मामुली’ शब्द विलासरावांना भोवला?, 1995 च्या निवडणुकीत करावा लागला होता पराभवाचा सामना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांना 1995 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्या पराभवामागे विकासकामांचा अभाव नव्हता.

Untitled Design (319)

Untitled Design (319)

Vilasrao Deshmukh had to face defeat because of the word ‘mamuli’ : 1995 सालची विधानसभा निवडणूक. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्या पराभवामागे विकासकामांचा अभाव नव्हता, तर एका कथित वक्तव्याचा गैरसमज असल्याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झाली. मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाविषयी त्यांनी काहीतरी आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्याच मुद्द्याचा राजकीय फायदा घेत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला, असे बोलले जाते.

याबाबत भाष्य करताना उल्हास बापट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नव्हता. विलासराव देशमुख यांना राजकीय द्वेषातून बदनाम करण्यासाठी खोटा प्रचार करण्यात आला. जात, धर्म किंवा भाषा यापलीकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व म्हणून विलासराव देशमुख ओळखले जात होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसमावेशक होते. मात्र, त्या काळात त्यांच्याविरोधात पद्धतशीरपणे गैरसमज पसरवण्यात आले आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला.

पराभवानंतर मात्र विलासराव देशमुख खचले नाहीत. सत्ता गेली तरी त्यांनी लोकांशी नातं तुटू दिलं नाही. ते पुन्हा गावोगावी गेले, लोकांच्या प्रश्नांसाठी झटले, विकासकामांचा पाठपुरावा केला. सत्तेबाहेर असतानाही लोकांसाठी काम करणारा नेता कसा असतो, याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं. आणि याच परिश्रमांचं फळ 1999 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं. त्या निवडणुकीत विलासराव देशमुख महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले.

प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला 15 सेकंदही पुरेसे…, नवनीत राणांनी इम्तियाज जलीलांना परखड शब्दांत सुनावले

त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही सूडबुद्धीने राजकारण केल्याचं पाहायला मिळालं नाही. विरोधकांवर वैयक्तिक टीका न करता, शांत आणि संयमी पद्धतीने काम करणं ही त्यांची ओळख होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीशी तुलना करताना अनेक जण विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची आठवण काढत आहेत.

आजही राजकीय वर्तुळात चर्चा ऐकू येते की, विलासराव देशमुख हयात असते तर काँग्रेसची महाराष्ट्रातील स्थिती कदाचित वेगळी असती. ग्रामपंचायतीपासून ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात विलासराव देशमुख यांच्याकडे तब्बल सहा महत्त्वाची खाती होती. या सर्व खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.

मंत्र्यांकडे वेळ नसतो, हा गैरसमज विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यशैलीतून खोटा ठरवला. प्रशासनावर पकड, लोकांशी थेट संवाद आणि सातत्यपूर्ण काम या जोरावर त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. म्हणूनच आजही विलासराव देशमुख यांचं नाव घेतलं की, महाराष्ट्राच्या राजकारणात मूल्याधिष्ठित आणि लोकाभिमुख नेतृत्वाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. असल्याचं यावेळी उल्हास बापट यांच्याकडून सांगण्यात आलं.

Exit mobile version