Virar building collapse two more bodies recovered in rescue operation still underway : विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी रमाबाई नावाची इमारत अचानक कोसळली. ही चार मजली इमारत कोसळली तेव्हा या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. पण आता मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 17 वर येऊन पोहोचला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे. या इमारत अपघातानंतर विरारसह संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
… तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर लाखो लोक उतरणार; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील ही इमारत दहा वर्षापूर्वीची होती. महापालिकेने अतिधोकादायक इमारत म्हणुन तिला घोषित केले होते. महापालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील सर्व नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. रात्री साडे अकरा वाजता अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली.
मोठी बातमी! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; ‘या’ प्रकरणात मिळाला जामीन
या भीषण दुर्घटनेला 36 तास उलटल्यानंतर आता आणखी दोन मृतदेहांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. हे मृतदेह एक महिला आणि पुरुषाचे असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवलं जात आहे. जेसीबीसारखे यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्यानं ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचावकार्यास वेग मिळाला.
बापरे! तब्बल 629 मिसाइल अन् ड्रोन्स युक्रेनवर धडकली, EU इमारत उद्धवस्त; 14 जणांचा मृत्यू
एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असुन, या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 9 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, जर अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील, तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असं आवाहन विरार पोलीस नागरिकांना करत आहेत.
या राज्यात भीक मागणं आता गुन्हा! विधानसभेत कायदा मंजूर, विरोधकांनी घेतला आक्षेप
या इमारत दुर्घटनेनंतर वसई-विरार महानगरपालिकेने इमारतीच्या बांधकामाची चौकशी सुरू केली असून इतर धोकादायक इमारतींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. इमारतीची अवस्था खराब होती, पण प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.