या राज्यात भीक मागणं आता गुन्हा! विधानसभेत कायदा मंजूर, विरोधकांनी घेतला आक्षेप

या राज्यात भीक मागणं आता गुन्हा! विधानसभेत कायदा मंजूर, विरोधकांनी घेतला आक्षेप

Begging is now a crime in Mizoram Law passed in the Assembly : मिझोराम विधानसभेने बुधवारी ‘Mizoram Prohibition of Beggary Bill, 2025’ ला मंजुरी दिली. या कायद्याचा उद्देश केवळ भिकाऱ्यांवर बंदी घालणे हा नाही तर त्यांना रोजगार आणि मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करणेे हा देखील आहे.

Ganesh Vandana : नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना

कायद्याची वैशिष्ट्ये

मिझोरामचे समाज कल्याण मंत्री लालरिनपुई म्हणाले की, सध्या मिझोराममध्ये भिकाऱ्यांची संख्या (Mizoram Prohibition of Beggary Bill) खूपच कमी आहे. याचे कारण येथील मजबूत सामाजिक रचना, चर्च आणि स्वयंसेवी संस्थांची मदत आणि सरकारी योजना आहेत. पण लवकरच सैरंग-सिहमुई रेल्वे मार्ग सुरू होणार आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी करतील. त्यानंतर बाहेरून येणाऱ्या भिकाऱ्यांची शक्यता वाढू शकते.

VIDEO : शासनाची अट मान्य! शिवनेरीच्या पायथ्यावरून मनोज जरांगेंनी नेमकी कोणती भूमिका घेतली?

या विधेयकाअंतर्गत (Mizoram Prohibition of Beggary Bill), सरकार एक राहत बोर्ड आणि रिसीविंग सेंटर उघडेल. भिकाऱ्यांना या केंद्रांमध्ये तात्पुरते ठेवले जाईल आणि 24 तासांच्या आत त्यांना त्यांच्या राज्यात किंवा घरी पाठवले जाईल. समाज कल्याण विभागाच्या सर्वेक्षणानुसार, राजधानी ऐझॉलमध्ये सध्या सुमारे 30 भिकारी आहेत, त्यापैकी बरेच जण बाहेरून आले आहेत.

अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध कायम, तरीही ट्रम्पकडून हिरे करार मंजूर! जाणून घ्या कारण

विरोध आणि समर्थन

दरम्यान राज्यातील विरोधकांनी या विधेयकाला (Mizoram Prohibition of Beggary Bill) आक्षेप घेतला आहे. एमएनएफ नेते लालचंदमा राल्टे म्हणाले की, हा कायदा राज्याच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतो आणि ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना मदत करण्याची समाज आणि चर्चची भूमिका मजबूत करावी असे त्यांनी सुचवले. त्याच वेळी, मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी स्पष्ट केले की, या कायद्याचा खरा उद्देश भिकाऱ्यांना शिक्षा करणे नाही. पण चर्च, एनजीओ आणि सरकारच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करणे आहे, जेणेकरून मिझोराम भिकारीमुक्त करता येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या