Vivekanand Patil’s Statement to Deepali Sayyed on Epstein Files: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं एस.एम. जोशी पुलावर आंदोलन सुरु आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) करत आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची जागा सोडणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थी आणि रोहित पवारांनी केला आहे. पण पोलिसांनी एस.एम. जोशी पुल परिसर मोकळा करा असं विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला समर्थन, पाठींबा देण्यासाठी विरोधी पक्षातले अनेक नेते विद्यार्थ्यांना भेट देऊन गेले. सत्ताधारी पत्रातीलही काही नेते विद्यार्थ्यांना भेटून गेले. राज्य सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत आहे. असे आश्वासनही देऊन गेले. पण जेव्हा शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyed) विद्यार्थ्यांना भेटायला आल्या तेव्हा भाषणावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना बोलूच दिलं नाही. मग परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन विद्यार्थी आंदोलक विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) याने मध्यस्ती केली.
‘देवानंच त्याचा जीव घेतलाय’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य
नेमकं काय घडलं?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद आंदोलनस्थळी पोहोचल्या. मी एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी याठिकाणी आली आणि तुम्हाला पाठिंबा दिला. तुमच्या मागण्या येत्या 2 दिवसांत नक्की पूर्ण होतील, असं दीपाली सय्यद विद्यार्थ्यांना म्हणाल्या. तेव्हा विद्यार्थ्यांनी गोंधळ केला, त्यांना बोलू दिलं नाही. मग विवेकानंद पाटील याने विद्यार्थ्यांची समजूत काढली. विवेकानंद म्हणाला, आधी त्यांचं ऐकून घ्या. मग प्रतिक्रिया द्या.
अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल
मग पुढे दीपाली सय्यद म्हणाल्या की, राज्य सरकार सर्व सामान्यांचं सरकार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅडव्होकेट आहेत. तुम्हाला ते नक्कीच न्याय देतील. मी तुमचा आवाज सरकारपर्यंत, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असून, ते तुमच्यासाठी काम करतील. विद्यार्थी जगला तर महाराष्ट्र आणखी मोठा होईल. तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी माझी मनापासून इच्छा आहे. येत्या दोन दिवसांत निकाल समोर येईल, त्यामुळे काळजी करू नका. एक कलाकार म्हणून मी तुमच्या पाठिंब्यासाठी इथे आले आहे. असे आश्वासन दीपाली सय्यद यांनी विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विवेकानंद बोलला.
काय म्हणाला विवेकानंद?
दीपाली ताई तुम्ही इकडे आल्याबद्दल तुमचे आभार. “तुम्ही सरकारमध्ये असूनही विद्यार्थ्यांसाठी धावून आलात. ताई आमच्या आहेत. आम्हाला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. तुम्ही आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा. इतके दिवस आंदोलन सुरू असूनही एकही कलाकार आंदोलनस्थळी आला नाही. त्यामुळे इतर कलाकारांचं पुढे काय करायचं, ते आम्ही बघू. मात्र, तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार. विद्यार्थ्यांचा राग तुमच्यावर नसून सरकारवर आहे, हे समजून घ्या.
पुणे विद्यापीठाला एफडीएचा दणका! कँटीनच्या किचनमध्ये झुरळं अन् अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा दिल्यास आम्ही तुमचा ‘एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट हाऊसफुल्ल करून दाखवू. पण तुम्ही तुमचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आणा. आम्हालाही खरातबाबा कोण आहे, हे पाहायचे आहे, असे विवेकानंद म्हणाला. विवेकानंदाच्या या मिश्किल विधानाने विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.
